बांगलादेशात (Bangladesh) तणाव पुन्हा वाढला आहे, कारण विद्यार्थी नेत्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांचे चर्चेचे निमंत्रण नाकारले आहे. या पार्श्वभूमीवर, ढाक्यात विद्यार्थी आंदोलकांनी प्रमुख रस्त्यांवर घेराव घालून शहराची वाहतूक ठप्प केली.
(हेही वाचा –MP wall collapse: मध्यप्रदेशात भिंत कोसळून ९ मुलांचा मृत्यू)
या आंदोलनाची मागणी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणविरोधात आहे. विशेषत: १९७१ च्या बांगलादेश मुक्तिसंग्रामात लढलेल्या माजी सैनिकांच्या नातेवाईकांना ३० टक्के आरक्षण देणारी कोटा प्रणाली रद्द करण्यासाठी हे आंदोलन होत आहे.अलीकडेच या मुद्द्यावरून पोलिस आणि विद्यार्थी आंदोलकांमध्ये हिंसक चकमकी घडल्या, ज्यामध्ये २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. (Bangladesh)
शुक्रवारी, पंतप्रधान हसीना यांनी विद्यार्थ्यांना चर्चेसाठी शासकीय निवासस्थानी येण्याचे आवाहन केले होते. हसिना यांनी या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसह चर्चेसाठी गणभवन येथे येण्याचे आवाहन केले होते, परंतु विद्यार्थी नेत्यांनी हे निमंत्रण नाकारले. यामुळे ढाक्यात पुन्हा निदर्शने सुरू झाली आहेत, त्यात दोन लोकांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जखमी झाले.या परिस्थितीत, ढाक्याच्या विविध ठिकाणी आंदोलकांनी रॅली काढल्याने सुरक्षा दलांना कडक पहारा ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Bangladesh)
(हेही वाचा –Pune Rain : पुण्यातील पुरस्थितीवर मुख्यमंत्र्यांचे स्थलांतरणाचे आदेश!)
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आंदोलकांनी शहरातील प्रमुख रस्ते अडवले, त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सत्ताधारी अवामी लीगने आरक्षणविरोधी आंदोलनाच्या समन्वयकांशी संवाद साधण्याचे काम तीन पक्षांच्या नेत्यांना सोपवले आहे. दरम्यान, दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांनी गोळीबार केल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप आणखी वाढला, पंतप्रधान हसिना यांनी संघर्ष टाळण्याचे आवाहन केले आहे, परंतु परिस्थिती तणावपूर्ण आहे. (Bangladesh)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community