महसूल विभाग लाचखोरीत नंबर १ तर पोलीस खाते दुसऱ्या क्रमांकावर

128

राज्याच्या महसूल विभागाने लाचखोरीत यंदाच्या वर्षी देखील पहिला क्रमांक कायम ठेवत पोलीस खात्याला देखील मागे टाकले आहे. पोलीस खाते हे लाचखोरीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. १ जानेवारी ते ४ डिसेंबर २०२२ या कालावधीत महसूल विभागात लाच लुचपत प्रतिबंधक विभागात लावलेल्या सापळ्यामध्ये १६० गुन्हे दाखल करण्यात आलेले असून पोलीस खात्यात १४८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

( हेही वाचा : FIFA World Cup : अंतिम सामन्यात ट्रॉफीचे अनावरण करण्याचा मिळाला बहुमान, ठरणार पहिली भारतीय अभिनेत्री )

राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते ४ डिसेंबर २०२२ दरम्यान राज्यभरात लावण्यात आलेले सापळे, तसेच दाखल करण्यात आलेले गुन्हे त्याच बरोबर जिल्हास्तरीय आणि विभाग स्तरीय आकडेवारी जाहीर केली आहे. लाचखोरीत पुणे जिल्हा एक नंबर असून मुंबई शहरात यावर्षी सर्वात कमी सापळे आणि गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राज्य सरकारी विभागाची आकडेवारी बघितली असता महसूल खाते सर्वात भ्रष्ट खाते असल्याचे दिसून येते. महसूल विभागात १६० गुन्ह्याची वर्षभरात नोंद झालेली असून याप्रकरणी २२१ जणांना अटक करण्यात आली होती, त्यात ४६ खाजगी व्यक्तीचा समावेश आहे. महसूल विभागाने यावर्षी ३६लाख ९४ हजार २५० रुपयांची लाच मागितली होती, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कागदोपत्री या रकमेची अधिकृत नोंद करण्यात आलेली आहे.

राज्याचे पोलीस खाते देखील भ्रष्ट खाते असून महसूल विभागाचा खालोखाल पोलीस खात्याचा भ्रष्टाचारात दुसरा क्रमांक लागला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या वर्षी राज्यभरात विविध जिल्ह्यात केलेल्या कारवाईत पोलीस विभागात १४८ गुन्हे दाखल करण्यात आले असून २०८ जणांना अटक करण्यात आली होती. त्यात ३२ जण खाजगी इसम आहेत तसेच लाच मागण्यात आलेली रक्कम ३९ लाख ३६ हजार ५०० रुपयांची मागणी वर्षभरात करण्यात आली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.