राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (अजित पवार गट) तालुका अध्यक्ष सचिन उर्फ मुन्ना कुर्मी याची भायखळ्यातील घोडपदेव येथे शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ३ संशयित हल्लेखोराना शनिवारी रात्री उशिरा शिवडी परिसरातून ताब्यात घेतले आहे. सचिन उर्फ मुन्ना याची हत्या आर्थिक वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Sachin Kurmi)
(हेही वाचा- Israel-Iran War : युद्धाजन्य वातावरणात अंबानींनी गमावले ३६,००० कोटी, तर अदानींचे २४,६०० कोटींचे नुकसान)
भायखळा पूर्व घोडपदेव येथे राहणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (अजित पवार गट) तालुका अध्यक्ष सचिन उर्फ मुन्ना कुर्मी याची शुक्रवारी रात्री मोटारसायकल वरून आलेल्या तीन जणांनी धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केली होती. सचिन कुर्मी हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा जवळचा कार्यकर्ता होता. या हत्याकांडाने संपूर्ण घोडपदेव हादरले होते, हल्लेखोरांनी सचिन कुर्मिवर १५ ते २० घाव करून निर्घृणपणे त्याची हत्या करून पळून गेले होते. पळून जाण्यापूर्वी हल्लेखोरांनी आपले लोकेशन मिळू नये म्हणून त्यांच्या जवळील मोबाईल घटनास्थळी फेकून पोबारा केला होता. (Sachin Kurmi)
या हत्येप्रकरणी भायखळा पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिमंडळ तीन चे पोलिस उपायुक्त उपाध्याय यांनी विशेष पथक तयार केले होते, तसेच गुन्हे शाखा कक्ष ३चे पथक हल्लेखोरांच्या मागावर होते. या हत्याकांडात अनेक तर्क वितर्क काढण्यात येत होते, राजकीय वादातून ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर येत होते, त्याच बरोबर कुर्मी हा माहिती अधिकार कार्यकर्ता (आरटीआय कार्यकर्ता) असल्यामुळे बांधकाम व्यवसायिकांनी त्याच्या हत्येची सुपारी दिली असावी असाही तर्क काढण्यात आला होता. भायखळा पोलीस आणि गुन्हे शाखेने या हत्येप्रकरणी दिवसभरात संशयित म्हणून जवळपास १० ते १२ जणांची धरपकड करून त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली होती. परंतु या हत्याकांडाला वेगळेच वळण मिळाले. (Sachin Kurmi)
ही हत्या राजकीय अथवा आरटीआयच्या वादातून झालेली नसून अर्थिक व्यहारातून झाल्याचे समोर आले, हे हत्याकांड घडवून आणणारी व्यक्ती काही दिवसांपूर्वी राज्यातील एका जिल्ह्यात रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून त्याने हे हत्याकांड घडवून आणले असल्याची माहिती गुन्हे शाखा आणि भायखळा पोलिसांच्या हाती लागली.भायखळा पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत तसेच सीसीटीव्ही फुटेज स्थानिक खबऱ्या मार्फत हल्लेखोरांचा माग काढून शनिवारी रात्री शिवडी परिसरातून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेले तिघे सुपारी बाज असून त्यांनी सचिन कुर्मीच्या हत्येची सुपारी घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. या अनुषंगाने पोलिसांकडून चौकशी सुरू असून लवकरच या तिघांना अटक करण्याची शक्यता आहे. (Sachin Kurmi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community