एखाद्या गंभीर गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे छायाचित्रे आणि संशयित म्हणून त्यांच्या नावाने प्रसिद्धीपत्रक काढणे हे त्या व्यक्तीला किती त्रासदायक होऊ शकते, याचे ताजे उदाहरण नुकतेच समोर आले आहे. अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणी छत्तीसगड आणि मुंबई पोलिसांनी केवळ संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या आकाश कनोजिया (Akash Kanojia) याला आपली नोकरी गमवावी लागली, तसेच त्याचे जुळलेले लग्न मोडले तसेच अनेक त्रासांना आकाश कनोजिया याला सामोरे जावे लागत आहे. सरकारी तपास यंत्रणांच्या या अनागोंदी कारभारामुळे सर्व काही गमावलेल्या आकाश कनोजियावर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. (Saif Ali Khan Attack)
मुंबईतील पश्चिम उपनगरातील वांद्रे पश्चिम येथे रहाणारे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान त्यांच्या सद्गुरू शरण आपर्टमेंट या निवासस्थानात घुसून १६ जानेवारी या दिवशी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास सैफ वर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर हल्लेखोराने तेथून पळ काढला होता, दरम्यान पोलिसांना सद्गुरू शरण येथील जिन्यातून पळून जाणाऱ्या हल्लेखोरांचा सीसीटीव्ही फुटेज मिळाले. हल्लेखोराला अटक करण्यासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेची जवळपास ३५ पथके म्हणजेच २०० पेक्षा अधिक पोलीस कामाला लावण्यात आले होते. (Saif Ali Khan Attack)
(हेही वाचा – BMC : तब्बल १९ वर्षांनंतर परवानाधारक प्लंबरच्या नोंदणी शुल्कांत वाढ)
प्रथम पोलिसांनी दक्षिण मुंबईतून हल्लेखोरासारखा दिसणारा शाहिद याला ताब्यात घेऊन त्याची ४ तास चौकशी करून सोडून दिले, त्यानंतर तपास पथके पुन्हा मुख्य हल्लेखोरांच्या शोध घेऊ लागले. पोलीस पथकाने आपले खबऱ्यांना सतर्क करून हल्लेखोराचे छायाचित्रे पाठवून खबऱ्याचे जाळे तयार केले होते. शोधकामादरम्यान पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सीसीटीव्हीमध्ये हुबेहूब दिसणारा एक व्यक्ती ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने छत्तीसगडकडे रवाना झाला आहे. मुंबई पोलिसांनी छत्तीसगड रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांची मदत घेतली. छत्तीसगड रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने दुर्ग रेल्वे स्थानकात पोहचलेल्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून संशयित म्हणून आकाश कनोजिया (Akash Kanojia) याला ताब्यात घेतले, ताब्यात घेतल्यानंतर रेल्वे पोलिसांनी मुंबई पोलिसांना सूचित करून त्याचे छायाचित्र काढून प्रसारमाध्यमे, तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. (Saif Ali Khan Attack)
दरम्यान मुंबई पोलिसांनी आकाश कनोजिया याला ताब्यात घेऊन मुंबईत आणले. आकाश कनोजिया (Akash Kanojia) ताब्यात घेतल्याचे वृत्त आणि त्याची छायाचित्रे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. अनेकांनी सोशल मीडियावर अशोकच्या व्हायरल फोटोवरून प्रश्न उपस्थित केले होते; परंतु सरकारी यंत्रणांनी आकाशच हल्लेखोर असल्याचे चित्र रंगवले होते. प्रसारमाध्यमांनी त्याचे नावासह छायाचित्रे प्रसिद्ध केले होती. मात्र आकाश कनोजिया (Akash Kanojia) हा हल्लेखोर नसल्याचे पुरावे हाती आल्यानंतर तपास यंत्रणांनी कनोजिया याला क्लिन चिट दिली आणि खरा गुन्हेगार महंमद शरीफुल या बांगलादेशीला ठाण्यातून अटक केली. (Saif Ali Khan Attack)
(हेही वाचा – Dhananjay Munde यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याबाबत चोवीस तासांत होणार निर्णय?)
आकाश कनोजियाला (Akash Kanojia) पोलिसांनी क्लिन चिट दिली; मात्र या सर्व प्रकारामुळे त्याच्या जीवनात वादळ उठले, आकाश ज्या कंपनीत नोकरी करत होता, त्याला तेथून काढण्यात आले, त्याचे जुळलेले लग्न मोडले गेले, समाजात त्याची नाहक बदनामी झाली. आकाश कनोजिया (Akash Kanojia) हा मुंबईतील पश्चिम रेल्वेमध्ये टुरिस्ट कंपनीत चालक म्हणून कामाला होता, १७ जानेवारी रोजी त्याला मुंबई पोलिसांचा फोन आला, त्यांनी त्याला विचारले की, तो कुठे आहे. त्याने आपण घरी असल्याचे अधिकाऱ्याला सांगितल्यावर त्यांनी फोन कट केला, दुसऱ्या दिवशी, छत्तीसगडमधील नेहला मूळ गावी माझ्या आजारी आजीला भेटण्याच्या आशेने मी मुंबईहून ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमध्ये बसलो. मला नेहला जाण्यासाठी बिलासपूरमध्ये ट्रेन बदलायची होती आणि नंतर माझ्या भावी वधूच्या कुटुंबाला भेटायचे होते,” असे आकाश कनोजिया याने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले. (Saif Ali Khan Attack)
१८ जानेवारी या दिवशी सकाळी 10 च्या सुमारास ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस दुर्ग जंक्शनवर पोहोचली, तेव्हा आरपीएफच्या (RPF) जवानांनी हल्लेखोर असल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेतले आणि रायपूरला नेले. जवळपास बारा तासांनंतर मुंबई पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. मी पोलिसांना सांगितले की, सैफ अली खानवरील हल्ल्याशी माझा काहीही संबंध नाही आणि त्यांना माझ्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी विनंती केली. मी त्यांना असेही सांगितले की, ते त्यांच्या शंकेचे स्पष्टीकरण देण्यासाठी माझ्या घराजवळ लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासू शकतात. पण त्यांनी लक्ष दिले नाही. त्याऐवजी, त्यांनी माझे फोटो काढले आणि मी हल्लेखोर असल्याचा दावा करून मीडियामध्ये प्रसारित केला,” असे आकाश कनोजियाने सांगितले. (Saif Ali Khan Attack)
(हेही वाचा – Flower Festival : मुंबईतील पुष्पोत्सवात सुमारे ५ हजार रोपांचा समावेश)
१८ जानेवारीच्या रात्री पोलिसांनी शरीफुल इस्लाम शेहजाद या बांगलादेशी नागरिकाला ठाण्यातून अटक केली आणि दावा केला की, त्यानेच दरोडा टाकण्याच्या उद्देशाने अभिनेत्याच्या निवासस्थानात प्रवेश केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस अधिकाऱ्यांनी कनोजियाला सोडले आणि त्याला सांगितले की, तो त्याच्या आजीला भेटायला जाण्यास मोकळा आहे.
जेव्हा मी माझ्या आईशी (मुंबईत) बोललो, तेव्हा ती खूप काळजीत होती; कारण माझे छायाचित्र सर्व वृत्तवाहिन्यांवर दाखवले गेले होते आणि मला ताबडतोब घरी परतण्यास सांगितले होते. दुसऱ्या दिवशी मी माझ्या नोकरीच्या ठिकाणी मालकाला फोन केला असता, ‘तुम्ही कायदेशीर अडचणीत आहात आणि मला तुमच्यामुळे अडचणीत पडायचे नाही’, असे सांगून त्यांनी मला कामावरून कमी केल्याचे सांगितले. मी त्याला हे प्रकरण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; पण तो माझे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नव्हता,” कनोजियाने म्हटले. याच सुमारास, त्याला त्याच्या आजीचाही फोन आला, ज्याने त्यांना सांगितले की, वृत्तवाहिन्यांवर त्याचा फोटो पाहून त्याच्या भावी वधूच्या कुटुंबाने लग्नास नकार दिला आहे. (Saif Ali Khan Attack)
“जे घडले ते अनपेक्षित आहे, मला माहित नाही की, मी भविष्यात लग्न करू शकेन,” असे कनोजियाने (Akash Kanojia) म्हटले आहे. बऱ्याच काळानंतर त्याच्या कुटुंबासाठी परिस्थिती चांगली दिसत होती, परंतु त्याच्या ताब्यात घेतल्याने ते सर्व बदलले आहे, असे त्याने सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community