Crime : पोलिसांच्या हातातून निसटलेल्या आरोपीला पवनहंस विमानतळावरुन घेतले ताब्यात

54
Crime : पोलिसांच्या हातातून निसटलेल्या आरोपीला पवनहंस विमानतळावरुन घेतले ताब्यात
  • प्रतिनिधी 

उलटीचा बहाणा करून पोलिसांच्या हातातून निसटलेला एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी हा जुहू येथील पवनहंस विमानतळावर अखेर पोलिसांना मिळून आला आहे. जुहू पोलिसांनी या आरोपीवर दुसरा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी दुपारी जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता. (Crime)

(हेही वाचा – मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची औरंगजेबच्या कबरी संदर्भात स्पष्ट भूमिका; म्हणाले, उदात्तीकरण चालणार नाही )

सैफ बिर अब्दुल खान असे या आरोपीचे नाव आहे. सैफ याच्यावर जुहू पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात शनिवारी अटक केली होती. जुहू पोलिसांनी शनिवारी सैफ याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान जुहू पोलीस ठाण्याचे एक पथक आरोपीला न्यायालयातून सांताक्रूझ पोलीस कोठडीत घेऊन निघाले होते. वाटेत त्याने पोलिसांना सांगितले की, त्याला मळमळतंय आणि उलटी सारखे वाटत आहे. (Crime)

(हेही वाचा – IPL 2025 : कोलकाता नाईट रायडर्स संघात स्टार बॉलर उमरान मलिकच्या जागी खेळणार ‘हा’ वेगवान गोलंदाज)

पोलिसांनी जुहू पवनहंस विमानतळ संरक्षण भिंत येथे पोलीस वाहन थांबवले व त्याला उलटी करण्यासाठी पोलीस व्हॅन मधून बाहेर काढले. उलटी करण्याचे नाटक करून आरोपी सैफ खान याने पोलिसांच्या हातावर झटका देऊन पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. आरोपी सैफ याने पवनहंस विमानतळाची संरक्षण भिंतीवरून आता उडी मारली. त्याच्या पाठोपाठ पोलीसानी संरक्षण भिंतीवरून उडी टाकली, सैफ खान याला ताब्यात घेतले. यामध्ये पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकातील एक पोलीस शिपाई किरकोळ जखमी झाले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सैफ या आरोपीवर जुहू पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.