जे. एस. डब्ल्यू. समूहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल (Sajjan Jindal) यांच्याविरोधात बुधवारी (१३ डिसेंबर) बी. के. सी. पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारदार अभिनेत्रीने सांगितले की, हा गुन्हा जानेवारी २०२२ मध्ये वांद्रे-कुर्ला संकुलातील कंपनीच्या मुख्य कार्यालयावरील पेंटहाऊसमध्ये झाला होता.
दुबईमध्ये पहिली भेट
अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, ती पहिल्यांदा जिंदालला (Sajjan Jindal) ऑक्टोबर २०२१ मध्ये दुबईत भेटली, जेव्हा दोघे एका स्टेडियमच्या व्हीआयपी बॉक्समध्ये आयपीएल सामना पाहत होते. त्यानंतर ते जयपूरमध्ये खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नात भेटले. या अभिनेत्रीने सांगितले की, मुंबईत झालेल्या त्यांच्या भेटीनंतर जिंदाल जवळीक साधू लागले आणि त्यांनी तिच्यावर जबरदस्ती केली.
(हेही वाचा – Maratha Reservation : उद्धव ठाकरेंची बैठक मराठा आंदोलकांनी उधळून लावली)
त्याने मला ‘बेबी’ म्हणून संबोधण्यास सुरुवात केली
पुढे अभिनेत्रीने सांगितले की, आम्ही आमच्या वैयक्तिक फोन नंबरची देवाणघेवाण केली आणि मुंबईत भेटलो कारण त्याने दुबईमध्ये रिअल इस्टेट सल्लागार असलेल्या माझ्या भावाकडून मालमत्ता खरेदी करण्यात रस दाखवला होता. त्यानंतर त्याने (Sajjan Jindal) मला ‘बेबी’ म्हणून संबोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते जेव्हा पहिल्यांदा एकटे भेटलो तेव्हा त्याच्या मिठी मारणे आणि फ्लर्ट करणे यासारख्या वागणुकीमुळे तिला अस्वस्थ वाटले. कालांतराने जिंदाल यांनी मेसेजद्वारे विवाहित असूनही तिच्याबद्दल प्रेमभावना व्यक्त केल्या.
जानेवारी २०२२ मध्ये, जेव्हा अभिनेत्री एका बैठकीसाठी कंपनीच्या मुख्यालयात होती, तेव्हा जिंदाल तिला पेंटहाऊसमध्ये घेऊन गेले. तिने सांगितले की तिचा सतत निषेध आणि नकार असूनही जिंदालने (Sajjan Jindal) तिच्यावर जबरदस्ती केली.
बीकेसी पोलिसांकडे तक्रार
त्या घटनेनंतर जिंदाल (Sajjan Jindal) यांनी जून २०२२ मध्ये माझा नंबर ब्लॉक करण्यापूर्वी ‘पोलिसांकडे गेल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील’ अशी धमकी दिली.” फेब्रुवारी २०२३ मध्ये तिने बी. के. सी. पोलिसांकडे लेखी तक्रार केली. पोलिसांनी तिच्या वारंवारच्या तक्रारींकडे लक्ष दिले नाही, म्हणूनच तिने न्यायालयात धाव घेतली, तेव्हा न्यायालयाने बी. के. सी. पोलिसांना तक्रार नोंदवण्याचे आदेश दिले. (Sajjan Jindal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community