१९८४च्या शीख विरोधी दंगलींदरम्यान (1984 anti-Sikh riots) झालेल्या हत्येशी संबंधित एका प्रकरणात (Delhi) न्यायालयाने काँग्रेसचे (Congress) माजी खासदार सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांनी दोषी ठरवले. आता दि. २५ फेब्रुवारी रोजी माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे. दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. सज्जन कुमार हे १ नोव्हेंबर १९८४ रोजी दिल्लीतील (Delhi) सरस्वती विहार परिसरात एका शीख बाप, लेकाच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते आणि आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
( हेही वाचा : Thane महापालिकेची अनधिकृत शाळांविरोधात कडक कारवाई; पोलिसांत तक्रार, एफआयआर दाखल)
या प्रकरणात सीबीआय (CBI) आणि तक्रारदारांनी सज्जन कुमार यांना फाशी देण्याची मागणी केली होती. मात्र रोज अॅव्हेन्यू न्यायालयाने सज्जन कुमार यांना १२ फेब्रुवारीला दोषी ठरवलं होतं आणि आता त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांना दोषी ठरवल्यानंतर शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सरचिटणीस जगदीप सिंग काहलोन (Jagdeep Kahlon) म्हणाले, “४० वर्षांपूर्वी शीख हत्याकांडाचे नेतृत्व करणाऱ्या सजन्न कुमार यांना दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना आता शिक्षा होईल, यासाठी मी न्यायालयाचे आभार मानतो. सत्तेत आल्यानंतर एसआयटी स्थापन केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचेही आभार मानतो, असेही काहलोन म्हणाले.
दरम्यान न्यायालयाच्या निर्णयावर भाजपा नेते मनजिंदर सिंग सारसा (Manjinder Singh Sirsa) म्हणाले की, आज सज्जन कुमार यांना शीखविरोधी दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. त्यांनी नरसंहार केला. काँग्रेसचे सर्व पाप उघडकीस येत आहेत. मी देशाच्या पंतप्रधानांचे आभार मानतो ज्यांनी एसआयटी स्थापन केली आणि या लोकांना तुरुंगात टाकले. आज देवाने न्याय दिला, असेही सारसा म्हणाले.
काय घडली होती घटना?
पंजाबमध्ये झालेल्या ऑपरेशन ‘ब्लू स्टार’नंतर ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर १ नोव्हेंबरच्या दिवशी राजधानी दिल्लीत शिखांविरोधात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला. या हिंसाचारात शीख समाजातील लोक आणि त्यांच्या मालमत्तेला लक्ष्य करण्यात आलं. 1984 anti-Sikh riots)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community