गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे सत्र सुरूच आहे. सलमान खाननंतर (Salman Khan) शाहरुख खानला (Shah Rukh Khan) धमकाविण्यात आले होते. अनोळखी व्यक्तीनं फोन करून शाहरुखकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर आता पुन्हा बिश्नोई टोळीकडून सलमान खानला धमकी देण्यात आली आहे. सलमान खानला (Salman Khan) मिळालेल्या धमकीची ही पाचवी घटना आहे.
(हेही वाचा-Maharashtra Assembly Election 2024: निवडणुकीच्या तोंडावर महागाई वाढली; महायुतीला फटका बसणार?)
सलमान खानला (Salman Khan) धमकी मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर आली आहे. धमकी देताना यात एका गाण्याचाही उल्लेख करण्यात आलाय. हे गाणं सलमान आणि बिश्नोई यांच्यावर आधारित आहे. धमकी देणाऱ्यानं म्हटलंय की, अशी गाणी लिहिणाऱ्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, परत गाणं लिहिता येणार नाही. तसंच धमकी देणाऱ्यानं सलमान खानला खुलं आवाहन दिलं आहे की, हिंमत असेल तर हे गाणं लिहिणाऱ्याला वाचव. या नंतर पोलिस आता या धमकीचा तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी याच हेल्पलाइनवर एक मेसेज आला होता. यामध्ये मी लॉरेन्सचा भाऊ बोलतोय. सलमान खान, (Salman Khan) वाद मिटवायचा असेल तर पाच कोटी रुपये दे आणि काळवीट हत्याप्रकरणात मंदिरात जाऊन माफी माग, नाहीतर वाईट परिणाम होतील, असं मेसेजमध्ये म्हटलं गेलं होतं. याबाबत वाहतूक पोलिसांनी माहिती देताच वरळी पोलिस ठाण्यात धमकी देणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर या प्रकरणात एका आरोपीला कर्नाटकातून अटक करण्यात आली होती.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community