Crime : प्रेयसीवर छाप पाडण्यासाठी लॉरेन्स बिष्णोईच्या नावे दिली धमकी; जोडप्याला अटक

114
Crime : भारतीय नागरिक बनून बेकायदेशीर रशियात गेलेल्या बांगलादेशी नागरीकाला अटक
Crime : भारतीय नागरिक बनून बेकायदेशीर रशियात गेलेल्या बांगलादेशी नागरीकाला अटक
  • प्रतिनिधी 

प्रेयसीवर छाप पाडण्यासाठी चित्रपट निर्माते-पटकथा लेखक सलीम खान यांना “मी लॉरेन्स बिष्णोईला पाठवू का?” या आशयाची धमकी देऊन दुचाकीवरुन पळून गेलेल्या प्रियकर प्रेयसीला शिवडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वाहनांच्या ताफ्यात शिरकाव करणाऱ्या २१ वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली होती. तोच सलमान खानचे वडील सलीम खान यांना दुचाकीवर आलेल्या या जोडप्याने धमकी दिली होती. या दोन्ही घटनेप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Crime)

(हेही वाचा – Noise Pollution : मिरवणुकांमध्ये डिजेचा वापर कमी, तरीही वाढली आवाजाची पातळी)

उमर आसिफ शेख (२६) आणि त्याची मैत्रीण अश्मा शेख (२२) असे अटक करण्यात आलेल्या जोडप्याची नावे आहेत. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी या जोडप्याचा लक्षात ठेवलेल्या चार अंकी स्कूटर क्रमांक (७४४४) पोलीस पथकाने कार्टर रोड ते शिवडीपर्यंतचे ८० सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासल्यानंतर दोघांना शिवडी परिसरातून गुरुवारी अटक करण्यात आली आहे. बॉलिवूड अभिनेते सलमान खान यांचे वडील सलीम खान हे बुधवारी सकाळी ८:४५ वाजता मॉर्निंग वॉक केल्यानंतर वांद्रे (पश्चिम) येथील गॅलेक्सी अपार्टमेंट्स या निवासस्थानापासून २५० मीटर अंतरावर असलेल्या विंडरमेअर बिल्डिंगजवळ विसाव्यासाठी बसले होते. एक एक्टीव्हा मोटारसायकलवरून बुरखाधारी महिला आणि एक पुरुष त्यांच्याजवळ आले व त्यांनी “मी लॉरेन्स बिश्नोईला पाठवू का?” अशी धमकी देऊन दोघेही तेथून पळून गेले, दरम्यान पळून जात असताना सलीम खान यांनी त्यांच्या मोटारसायकलचा शेवटचे चार अंकी क्रमांक लक्षात ठेवून अंगरक्षक कॉन्स्टेबल दीपक बोरसे यांना माहिती दिली. अंगरक्षक बोरसे यांनी या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन गुन्हा दाखल केला. (Crime)

(हेही वाचा – Kolhapur Rape Case : कोल्हापूर पुन्हा हदारलं! पगारवाढीच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार)

या संशयिताच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी तात्काळ एक पथक त्यांच्या मागावर पाठवले, सलीम खान यांनी दिलेल्या अर्धवट क्रमांकावरून पोलिसांनी कार्टर रोड ते शिवडीपर्यंतचे ८० सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले असता त्यात पोलिसांनी संशयित एक्टीव्हा मोटारसायकल आढळून आली. या मोटारसायकलच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरटीओ कडून माहिती मिळवून शिवडी परिसरातून उमर आसिफ शेख (२६) आणि त्याची मैत्रीण अश्मा शेख (२२) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली देत प्रेयसीवर छाप पाडण्यासाठी आपण हे कृत्य केल्याची कबुली उमर आसिफ शेख याने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय कायदा कलम २९२ (सार्वजनिक उपद्रव), ३५३ (२) (सार्वजनिक उपद्रव) आणि ३ (५) (सामान्य हेतूने केलेले गुन्हेगारी कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.