सलमान खान गोळीबार प्रकरणात (Salman Khan Firing Case) वापरण्यात आलेल्या २ पिस्तुल आणि ४ मॅगझीन सुरत च्या तापी नदीच्या पात्रातून हस्तगत करण्यात आल्या आहेत. मुंबई क्राईम ब्रँच (Mumbai Crime Branch) चे चकमक फेम (एन्काऊंटर स्पेशालिस्ट) दया नायक (Daya Nayak) यांचे पथक सोमवारी सुरत येथे पिस्तुलच्या शोधात दाखल झाले होते. (Salman Khan Firing Case)
(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: बारामतीमध्ये अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ चिन्ह, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे धाव)
पाणबुडीच्या मदतीने या पथकाने सोमवारी (२२ एप्रिल) एक पिस्तुल आणि एक काडतुस तापी नदीच्या (Tapi River) पात्रातून बाहेर काढण्यात आले होते. गुन्ह्यात वापरलेले दुसरे पिस्तुल आणि मॅगझीन चा शोधासाठी मंगळवारी (२३ एप्रिल) शोध मोहीम राबविण्यात आली होती.आज सकाळी या शोध पथकाला आणखी एक पिस्तुल आणि ४ मॅगझीन नदीच्या पात्रात मिळून आले आहे. (Salman Khan Firing Case)
(हेही वाचा- Devendra Fadnavis: तोंडाच्या वाफा दवडण्यापलिकडे काही येत नाही, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल)
सलमान खान निवासस्थानावर झालेल्या गोळीबारात हल्लेखोरांनी वापरलेले दोन्ही पिस्तुल आणि काडतुसे आणि मॅगझीन तापी नदीच्या (Tapi River) पात्रात फेकले होते. या दोन्ही पिस्तुल आणि मॅगझीन मिळून आल्यामुळे या गुन्ह्यातील महत्वाचा पुरावा गुन्हे शाखेच्या हाती लागला आहे. हे दोन्ही पिस्तुल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब कडे पाठविण्यात येमार आहे. (Salman Khan Firing Case)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community