Salman Khan Firing Case : अनुजच्या मृत्यूचा तपास CBI कडे देण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार

१ मे रोजी अनुज कुमार थापन याने पोलीस कोठडीत असलेल्या शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे.

180
Salman Khan Firing Case : अनुजच्या मृत्यूचा तपास CBI कडे देण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार

सलमान खान प्रकरणातील पोलीस कोठडीत आत्महत्या करणारा आरोपी अनुज थापन याचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबांनी नकार दिला आहे. अनुज याची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबांनी केला आहे, तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करून सीबीआय (CBI) चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांकडून दबाव असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. (Salman Khan Firing Case)

बॉलिवूड अभिनेता सलमान (Salman Khan) खानच्या वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या दोन हल्लेखोरांना गुजरात राज्यातून आणि त्यांना शस्त्र पुरवठा करणाऱ्या अनुज थापन आणि सोनू चंदर यांना पंजाबमधून अटक केली होती. ४ आरोपींपैकी सोनू चंदर याला दुर्धर आजार असल्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले असून अनुज थापन, विकी गुप्ता आणि सागर पाल या तिघांना ८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. (Salman Khan Firing Case)

या तिघांना मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. १ मे रोजी अनुज कुमार थापन याने पोलीस कोठडीत असलेल्या शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला आहे. अनुजचा मृतदेह शवविच्छेदन जेजे रुग्णालयात करण्यात आले आहे. अनुजच्या आत्महत्येचे वृत्त कुटुंबाना देण्यात आली असता अनुजचे आजोबा जसवंत सिंग, मामा कुलदीप विश्नोई, चुलत भाऊ विक्रम थापन हे वकिलासह बुधवारी मुंबईत आले आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत कुटुंबीयांनी अनुज थापनचा मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यांनी अनुजाच्या आत्महत्येची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणीही केली असून, त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबांनी केली आहे. (Salman Khan Firing Case)

(हेही वाचा – Kurla Bhabha Hospital : रुग्णाच्या नातेवाईकांकडून नर्सना शिवीगाळ, आता नेमणार अतिरिक्त सुरक्षा रक्षक)

मृतदेह ताब्यात घेण्यास सातत्याने दबाव 

“मुंबई पोलिस अनुजचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आमच्यावर दबाव आणत आहेत. मृतदेह विमानाने घेऊन जाण्यासाठी त्यांनी पंजाब ते मुंबईचे भाडे देऊ केले आहे. पोलिसांनी आम्हाला अनुजच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी नेले पण त्यांनी आम्हाला फक्त त्याचा चेहरा दाखवला, पूर्ण शरीर दाखवले नाही. अनुज थापनच्या मानेवरील खुणा पाहता त्याचा खून झाल्याचे स्पष्ट होत आहे. ही आत्महत्येची घटना वाटत नाही असा आरोप कुटुंबांनी केला आहे. २३ एप्रिल रोजी पोलिसांनी अनुजला अटक केल्यावर कुटुंबीयांना कळवले नाही, ते त्याला मुंबईला घेऊन गेले. १ मे रोजी दुपारी ३ वाजता मुंबई पोलिसांना फोन करून अनुज थापनने आत्महत्या केल्याची माहिती दिली. (Salman Khan Firing Case)

मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पोलिस सातत्याने आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जोपर्यंत याप्रकरणी कारवाई होत नाही, सीबीआय (CBI) तपास होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे भाऊ विक्रम यांनी सांगितले. अनुज थापनच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता परमहंस दीक्षित म्हणाले, “आता आम्हाला अनुजचा संपूर्ण वैद्यकीय अहवाल हवा आहे, ज्यात शवविच्छेदन आणि चौकशी पंचनाम्याचा समावेश आहे. परंतु रुग्णालय प्राधिकरणाने सांगितले की त्यांनी शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण राखून ठेवले आहे आणि सर्व वैद्यकीय कागदपत्रे त्यांच्याशी सामायिक केलेली नाहीत. अनुजच्या कुटुंबांनी केलेला हत्येचा दावा मुंबई पोलिसांनी फेटाळून लावला आहे. (Salman Khan Firing Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.