बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या निवासस्थानावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना गुजरातच्या भुज येथून सोमवारी रात्री मुंबई गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.या दोघांना मंगळवारी सकाळी मुंबईत आणण्यात आले असून दोघांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (Salman Khan Firing Case)
निखिल गुप्ता (Nikhil Gupta) आणि सागर पाल (Sagar Pal) असे दोघांचे नावे आहेत. हे दोघे लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.रविवारी पहाटे बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या वांद्रे येथील गॅलक्सि आपर्टमेंट मोटारसायकल आलेल्या या दोघांनी गोळीबार करून पळ काढला होता. मुंबई गुन्हे शाखेने या दोघांचा माग काढत प्रथम या दोघांनी वापरलेली मोटारसायकल वांद्र्यातील माउंटमेरी येथून ताब्यात घेतली होती, त्यानंतर या मोटरसायकलच्या मालकाचा शोध घेतला असता ही मोटारसायकल पनवेल येथे राहणाऱ्या एका व्यक्तीकडून यादोघांनी विकत घेतल्याचे तपासात समोर आले होते. (Salman Khan Firing Case)
तसेच हल्लेखोर हे पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथे महिण्याभरापूर्वी भाड्याने राहत होते अशी माहिती तपासत समोर आली. गुन्हे शाखेने घरमालक, मोटारसायकल मालक आणि एजंटला चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या चौकशीत पोलिसांनी दोघांची ओळख पटवली होती. (Salman Khan Firing Case)
(हेही वाचा- Salman Khan : सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार, गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा व्यवस्था वाढवली)
दरम्यान गुन्हे शाखेचे विविध पथके गुजरात,युपी, मध्यप्रदेश येथे रवाना झाली होती. या दोघांचा शोध घेत असताना हे दोघे गुजरात राज्यातील भुज येथे लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच सोमवारी रात्री भुज (Bhuj) येथून दोघांना अटक करण्यात आली आहे. (Salman Khan Firing Case)
हेही पहा-