सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरणात (Salman Khan Firing Case) पंजाब येथून आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोघांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने या दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या ४ झाली आहे. नुकतीच अटक करण्यात आलेल्या दोघांनी हल्लेखोरांना हत्यार पुरविले होते. (Salman Khan Firing Case)
सोनू चंदर आणि अनुज थापन असे पंजाब येथून गुरुवारी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या गुन्ह्यात लॉरेन्स बिष्णोई आणि अनमोल बिष्णोई या बंधूंना देखील आरोपी दाखविण्यात आले आहे. लॉरेन्स हा तिहार तुरुंगातुन आणि अनमोल हा परदेशातून बिष्णोई टोळीची सूत्रे हलवत आहे. बिष्णोई टोळीच्या निशाण्यावर असलेला बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) यांच्या वांद्रे येथील गॅलेक्सी आपर्टमेंट येथे १४ एप्रिल रोजी पहाटे झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने गुजरात राज्यातील भुज येथून विकी गुप्ता आणि सागर पाल या हल्लेखोरांना अटक करण्यात आली होती. या दोघांच्या चौकशीत या दोघांना हल्ल्यासाठी पिस्तुल आणि काडतुसे पुरवणाऱ्याची नावे उघड झाली होती. (Salman Khan Firing Case)
(हेही वाचा – Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरण – दोन्ही हल्लेखोरांना गुजरातमधून अटक)
त्यांना अटक करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक पंजाब येथे रवाना झाले होते. गुरुवारी या दोघांना ताब्यात घेऊन रात्री मुंबईत आणून अटक करण्यात आली. शुक्रवारी या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी अनुज हा सराईत गुन्हेगार असून लॉरेन्स टोळीचा सदस्य आहे. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न आणि खडणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Salman Khan Firing Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community