Salman Khan Threat : सलमानला धमकी देणाऱ्या बिष्णोईला कर्नाटकातून अटक

125
Salman Khan Threat : सलमानला धमकी देणाऱ्या बिष्णोईला कर्नाटकातून अटक
Salman Khan Threat : सलमानला धमकी देणाऱ्या बिष्णोईला कर्नाटकातून अटक
ट्रॅफिक पोलिसांच्या हेल्पलाइनवर सलमान खानला धमकीचा मेसेज पाठवून ५ कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी कर्नाटकातील एका ३२ वर्षीय व्यक्तीला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. मूळचा राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील असून, आरोपी बिखुराम उर्फ ​​विक्रम जलाराम बिश्नोई याला कर्नाटकातील हवेली जिल्ह्यातून पकडण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त (झोन 3) दत्तात्रय कांबळे यांनी सांगितले. (Salman Khan Threat)
बिश्नोई हा मागील १० वर्षांपासून कर्नाटक राज्यात राहतो,आणि वेल्डरचे काम करतो. अटकेनंतर त्याला ट्रान्झिट रिमांड मागण्यासाठी कर्नाटक न्यायालयात हजर करण्यात आले. दोन दिवसांची कोठडी मंजूर झाल्यानंतर वरळीचे पोलीस आरोपीसह मुंबईला रवाना झाले. दरम्यान, धमकी देण्यामागचा हेतू शोधण्यासाठी तपास सुरू आहे.  (Salman Khan Threat)
४ नोव्हेंबरच्या रोजी आरोपींने मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर एक मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये एकतर खान यांनी बिश्नोई समाजाची माफी मागावी अन्यथा ५ कोटी रुपये द्यावेत असा इशारा दिला होता. “त्याने तसे केले नाही तर आम्ही त्याला ठार मारू; आमची टोळी अजूनही सक्रिय आहे,” अशी धमकी दिली होती, आणि तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा केला.वरळी पोलिसांनी धमकी देणाऱ्याचे लोकेशन कर्नाटकात शोधून काढले आणि स्थानिक पोलिसांना सतर्क केले. त्यानंतर बिष्णोईला ताब्यात  घेऊन अटक करण्यात आली.  (Salman Khan Threat)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.