बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ईमेल करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकाला राजस्थानातून अटक करण्यात आली आहे. वांद्रे पोलिसांनी जोधपूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली आहे.
( हेही वाचा : शिंदे-फडणवीसांचा कारभार आता एअर इंडियाच्या इमारतीतून?)
धाकड राम बिष्णोई (२१)असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या राहत्या घरातील कार्यालयाच्या ईमेल आयडीवर १८ मार्च रोजी एक अनोळखी मेल आला होता, या मेलमध्ये धमकीचा मजकूर लिहण्यात आला होता, थेट सलमान खानला जीवे मारण्याची धमकी या मेलद्वारे देण्यात आली होती. रोहित गर्ग नावाच्या व्यक्तीच्या मेलवरून आलेल्या देण्यात आलेल्या धमकीमध्ये लॉरेन्स बिष्णोई, गोल्डी भाय उर्फ गोल्डी ब्रार याच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे प्रकरण गंभीरपणे घेऊन गुन्ह्याचा तपासा करण्यासाठी वांद्रे पोलीस ठाण्याचे पथक तयार करण्यात आले होते. वांद्रे पोलिसांनी सायबर विभागाची मदत घेऊन ईमेलचा आयपी अड्रेस तपासला असता तो युके म्हणजे लंडन येथील दाखवत होता. या गुन्ह्याचा सखोल तपास केला असता मेल पाठवणारी व्यक्ती ही जोधपूर जिल्ह्यातील एका शहरातील असल्याची माहिती वांद्रे पोलिसांना मिळाली. वांद्रे पोलिसांनी जोधपूर पोलिसांच्या मदतीने रविवारी धाकड राम बिष्णोई (२१) याला अटक केली आहे.
Join Our WhatsApp Community