Sambhaji Nagar Crime: घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण; निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू  

240
Sambhaji Nagar Crime: घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण; निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू  

सरकारी वैयकीय महाविद्यालयात (Medical College) मागील काही दिवसांपासून निवासी डॉक्टरांना मारहाणीच्या घटना जास्त प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टरांच्या सुरकक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित माराहणीच्या घटना घडल्यानंतर प्रशासन दखल घेते मात्र काही दिवसाच परिस्थिती जैसे थे होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. दरम्यान अशीच एक घटना संभाजीनगर येथील घाटी वैयकीय महाविद्यालयात (Ghati Medical College) घडली असून, यामध्ये निवासी डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तसेच मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Sambhaji Nagar Crime)    

मारहाणीत डॉक्टर जखमी

घाटी रुग्णालयातील वार्ड १९ मध्ये एका रुग्णावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर आवश्यक ते उपचार करीत होते, तरीही या रुग्णाच्या उपचाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणत नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला. या मारहाणीत संबंधित निवासी डॉक्टर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन करीत असल्याचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. रोहन गायकवाड यांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी घाटीत धाव घेऊन निवासी डॉक्टरांशी संवाद साधला. दरम्यान, हल्ला करणाऱ्यास अटक होईपर्यंत रुग्णसेवा देणार नाही, केवळ आयसीयू मध्ये रुग्णसेवा चालू असेल असा पवित्रा आंदोलक डॉक्टरांनी घेतला आहे. (Sambhaji Nagar Crime)

(हेही वाचा – Kanchanjunga Express Train Accident १५ जणांचा मृत्यू, ६० जखमी; पंतप्रधान मोदींकडून आर्थिक मदत जाहीर)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच समोर येत आहे. घटना घडल्यावर प्रशासन दखल घेते, मात्र काही दिवसातच परिस्थिती जैसे थे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार असल्याचे डॉक्टरतर्फे सांगण्यात आले आहे.

निवासी डॉक्टरांच्या काय आहेत मागण्या

सर्व निवासी डॉक्टर अपघात विभागसमोर एकत्र आले. अपघात विभागात रुग्णसेवा देणार नसल्याचा पवित्रा निवासी डॉक्टरांनी घेतला. निवासी डॉक्टरांसोबत त्यांनी चर्चा केली. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणे, याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे आदी मागणी निवासी डॉक्टरांनी अधिष्ठातांकडे केल्या आहेत. याबाबत अधिष्ठाता डॉ. शिवाजी शुक्रे यांनी देखील सकारात्मक आश्वासन दिले आहे. (Sambhaji Nagar Crime)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.