मुंबई एनसीबीचे माजी झोनल संचालक समीर वानखेडे यांच्यावर मनी लॉंड्रिंगप्रकरणी ( money laundering case ) शनिवारी ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावरील मनी लॉंड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यांच्यावरील या गुन्ह्याची पूर्वीही चौकशी सुरू होती. त्यामुळे आता पुन्हा समीर वानखेडे नव्या अडचणीत अडकले आहेत. यापूर्वीही त्यांची ईडी चौकशी सुरू होती.
अंमलबजावणी संचालनालयाने (ED)ने शनिवारी, १० फेब्रुवारीला हा गुन्हा दाखल केला आहे. समीर यांच्यावर गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर ईडीने एनसीबीच्या ३ अधिकाऱ्यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे. याशिवाय काही खासगी लोकांचीही चौकशी केली जाणार आहे. तपास यंत्रणेने या सर्वांना चौकशीसाठी मुंबईतील ईडी कार्यालयात बोलावले आहे. बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या ड्रग्ज प्रकरणापासून समीर वानखेडे चर्चेत आले होते.
(हेही वाचा – Amit Shah : भारताची संस्कृती आणि रामायण वेगळे करता येणार नाही)
Join Our WhatsApp Community