Sangli Drugs : सांगलीत १५० कोटी रुपयांचे एमडी-ड्रग्ज जप्त; मुंबई पोलिसांचा कवठेमहांकाळ येथे छापा

नुकताच पुणे पोलिसांनी कुपवाड येथून जवळपास ३०० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त केला होता. या पाठोपाठ कवठेमहांकाळ तालुक्यातील सापडलेल्या ड्रग्जमुळे खळबळ उडाली आहे.

342
NCBने जप्त केलेले ९८२ किलो अमली पदार्थ केले नष्ट
NCBने जप्त केलेले ९८२ किलो अमली पदार्थ केले नष्ट

सांगली जिल्ह्यातील (Sangli Drugs) कवठेमहांकाळ तालुक्यामधील इरई गावातल्या शेतातील एमडी ड्रग्जच्या कारखान्यावर सोमवारी मुंबई पोलिसांनी धाड टाकली. यावेळी सुमारे १०० किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत १५० कोटींच्या आसपास आहे.

(हेही वाचा – ST Buses : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा एसटी महामंडळाला फटका; प्रवाशांची गैरसोय)

मुंबई आणि सांगली पोलिसांची संयुक्त कामगिरी :

मुंबई क्राईम ब्रँच आणि सांगली पोलिसांनी कवठेमहांकाळ तालुक्याच्या इरई गावातील शेतात छापा टाकून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज (Sangli Drugs) जप्त केले आहेत. इरळी गावातल्या एका शेतात असणाऱ्या घरात हा एमडी ड्रग्जचा साठा असल्याची माहिती मिळताच हा छापा टाकण्यात आला आहे.

(हेही वाचा – Shiv Sena UBT : भाजपची कलाबेन डेलकर यांना उमेदवारी; उबाठा गटाकडून अभिनव डेलकर यांची हकालपट्टी)
पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू :

नेमका हा ड्रग्जचा (Sangli Drugs) साठा कुठून आला आणि त्याचं काय करण्यात येत होते, तसेच सांगली ड्रग्ज आणि पुणे ड्रग्ज कनेक्शन आहे का ? याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. नुकताच पुणे पोलिसांनी कुपवाड येथून जवळपास ३०० कोटींचा ड्रग्ज साठा जप्त केला होता. या पाठोपाठ कवठेमहांकाळ तालुक्यातील सापडलेल्या ड्रग्जमुळे (Sangli Drugs) खळबळ उडाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.