सांगलीच्या पलूस येथे गर्भवती माता आणि बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात चक्क मृत वाळा साप आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात वाळा जातीच्या सापाचं मृत पिल्लू आढळून आलं आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. (Sangli Poshan Aahar)
पलूस येथील एका अंगणवाडीमधून डाळ, तांदूळ, तिखट, मीठ एकत्र असणारे पॅकेटचे वाटप करण्यात आले होते. ज्यामध्ये माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष याच्यासाठी आलेला पोषण आहार घरी नेला होता. आहाराचे पॅकेट उघडल्यानंतर त्यामध्ये मृत वाळा साप आढळून आला. जाधव यांनी या सर्व प्रकाराची माहिची अंगणवाडी सेविकांना दिली. (Sangli Poshan Aahar)
(हेही वाचा- Hathras Accident : सत्संगामधील चेंगराचेंगरीत ११६ जणांचा मृत्यू; प्रवचन देणारा भोले बाबा फरार)
सदर प्रकरण लक्षात येताच अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ पातळीवर देखील याची माहिती देत, पोषण आहार वाटप कार्यक्रम थांबवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सहा महिन्यांपासून तीन वर्षांच्या बालकांसाठी आणि गर्भवती महिलांसाठी सुदृढ आरोग्य रहावे, या दृष्टीने पोषण आहार वाटप करण्यात येतो. मात्र या पोषण आहारात मृत साप आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. नुकतेच राज्य सरकारकडून एकाच ठेकेदाराकडे हा पोषण आहार वाटपाचा ठेका देण्यात आला होता. त्या माध्यमातून आलेल्या या पोषण आहारात वाळा साप मृत अवस्थेत आढळून आल्याने या आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे (Sangli Poshan Aahar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community