सैफ अली खानवरील हल्ल्याच्या आडून Sanjay Raut यांची पंतप्रधानांवर टीका

86
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या आडून Sanjay Raut यांची पंतप्रधानांवर टीका
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या आडून Sanjay Raut यांची पंतप्रधानांवर टीका

मुंबईत अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर तीव्र टीका केली.

“सैफ अली खानसारख्या (Saif Ali Khan) मोठ्या कलाकारावर हल्ला होणं ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी (PM Narendra Modi) धक्कादायक बाब आहे. महाराष्ट्रात सामान्य जनता सुरक्षित नाही. घरात आणि झोपड्यांमध्ये लोक घुसत आहेत. आता कलाकारांच्या घरांमध्ये चोर घुसून हल्ले होत आहेत. हा राज्य सरकारसाठी आणि गृहमंत्र्यांसाठी मोठा सवाल आहे,” असे राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

(हेही वाचा – अभिनेता Saif Ali Khan वर चाकूने हल्ला; नेमकं काय घडलं ?)

पंतप्रधान मोदींच्या भेटीचा संदर्भ

राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले की, “१५ दिवसांपूर्वी सैफ अली खान कुटुंबासह पंतप्रधान मोदींना (PM Narendra Modi) भेटायला गेले होते. मोदींनी त्यांच्या कुटुंबासोबत एक तास घालवला होता. त्यानंतरच त्यांच्यावर हल्ला झाला. मुंबईत पंतप्रधान असतानाही अशी घटना घडते, हे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या दुरवस्थेचे उदाहरण आहे.”

पोलीस यंत्रणेवर आणि सरकारवर निशाणा

“राज्यातील ९० टक्के पोलीस आणि सुरक्षा आमदार, फुटलेल्या नेत्यांसाठी वापरली जाते. गद्दारांना सुरक्षा पुरवली जाते, पण पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या सैफ अली खानसारख्या व्यक्तीला सुरक्षितता नाही,” असे राऊत यांनी नमूद केले.

(हेही वाचा – Jamkhed Accident : जामखेडमध्ये भीषण अपघात; बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून ४ जणांचा मृत्यू)

सुरक्षा आणि कारवाईची मागणी

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर टीका करत कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली. “महिला आणि नागरिकांसाठीही रस्त्यावर फिरणं कठीण झालं आहे. सरकारने तातडीने परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत,” असा इशाराही त्यांनी दिला.

सैफ अली खानवरील (Saif Ali Khan) हल्ल्याने महाराष्ट्रातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.