ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांचे आमदार बंधू सुनील राऊत यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी दोन जणांना गोवंडी येथून अटक करण्यात आली आहे. मात्र धमकी प्रकरणातील तिसरा व मुख्य आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे.
उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांचे आमदार बंधू सुनील राऊत यांना गुरुवार, ८ जून रोजी अनोळखी मोबाईल क्रमाकावरून आलेल्या कॉल वरून अज्ञात व्यक्तीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, एवढ्यावर न थांबता राऊत बंधू यांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. याप्रकरणी राऊत यांनी वरिष्ठ पोलिस अधिकारी यांची भेट घेऊन या प्रकरणी तक्रार केली.
(हेही वाचा – भाजपाच्या ठाणे लोकसभा प्रमुखपदी विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती)
भांडुप पूर्व येथे राहणारे राऊत बंधू (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा पर्यत कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारे कांजूरमार्ग पोलिसांनी आरोपीचा तांत्रिकदृष्टया शोध घेऊन रात्री उशिरा गोवंडी परिसरातून रिझवान जुल्फिकार अन्सारी (२७) आणि शाहिद अन्सारी (२६)या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान ज्या मोबाईल क्रमांकावरून राऊत बंधूना (Sanjay Raut) धमकवण्यात आले, तो मोबाईल फोन एकाचा तर मोबाईलचे सीम कार्ड दुसऱ्याच्या नावावर आणि धमकी तिसऱ्याच व्यक्तीनेच दिल्याचे समोर आले. शुक्रवारी (९ जून) रात्री उशिरा कांजूरमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिझवान आणि शाहिद या दोघांना अटक केली असून तिसऱ्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community