Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण

187
Santosh Deshmukh हत्येच्या चौकशीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पाषाण येथील सीआयडीच्या ऑफिसमध्ये पोलिसांना शरण आला. त्यापूर्वी १० मिनिटे त्याने व्हिडिओ करून पोलिसांना लवकरच शरण येणार असल्याचे सांगितले होते. या व्हिडिओमध्ये त्याने तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी मी दोषी असेन, तर न्यायदेवता मला जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे, तसेच या प्रकरणातील सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.

(हेही वाचा – Arunachal Pradesh सरकार अवैध धर्मांतराला आळा घालणार; आता लागू होणार ‘हा’ कायदा)

बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरणामुळे बीडचे राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यभरातही यासाठी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. वाल्मिक कराड हे गेल्या २२ दिवसांपासून फरार होते. संशयित वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथके आणि १५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. संतोष देशमुख हत्या, तसेच दोन कोटी रुपयांची खंडणी या प्रकरणांत वाल्मीक कराड आरोपी आहेत.

बँक खाती गोठवली

वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचा मोबाईल 13 डिसेंबरपर्यंत सुरूच होता. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे देखील मध्य प्रदेशात दिसल्याचे यंत्रणांच्या तपासात समोर आले आहे. 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मध्यप्रदेशातील श्री क्षेत्र उज्जैन महाकाल ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे फोटो त्यांच्याच फेसबुक अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहेत. एकूण 9 सीआयडी पथके संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मारेकऱ्यांचा तपास करत आहेत. आतापर्यंत सीआयडीकडून वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांच्या फरार मारेकऱ्यांची बँक खाती गोठवली आहेत. तसेच या सर्वांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.

मालमत्ता होणार जप्त

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी न्यायालयात पत्र देऊन जप्तीची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी महसूल आणि उपनिबंधक कार्यालयाला पत्रही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.