ससून रुग्णालयातून सुरू झालेला मेफेड्रोन प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून आता मुंबईतील अमली पदार्थ विरोधी विभागाकडे (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो-एनसीबी) सोपविण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतून एक हजार ८२६ किलो मेफेड्रोन जप्त केले होते. (Sassoon Hospital)
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून ‘एनसीबी’कडे (NCB) कागदपत्रे सोपविली, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार (CP Amitesh Kumar) यांनी दिली. पोलिसांनी देशातील विविध ठिकाणी कारवाई करून जप्त केलेल्या मेफेड्रोनची (Mephedrone) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत तीन हजार ६७४ कोटी ३५ लाख ३० हजार रुपये आहे. (Sassoon Hospital)
(हेही वाचा – पराभव जिव्हारी लागल्याने रडीचा डाव, EVM प्रकरणी Ravindra Waikar यांचा पलटवार)
मेफेड्रोन विक्री, तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांनी सोमवार पेठेत कारवाई करून गुंड वैभव ऊर्फ पिंट्या माने, साथीदार अजय करोसिया, हैदर शेख यांना पकडले होते. शेख याच्या विश्रांतवाडीतील गोदामात छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन, कच्चा माल जप्त करण्यात आला होता. तपासात विश्रांतवाडी, सोमवार पेठेतून जप्त केलेले मेफेड्रोन कुरकुंभ येथील अर्थकेम कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कंपनीचा मालक भीमाजी साबळे, रासायनिक अभियंता युवराज भुजबळ, आयुब मकानदार यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सुनील बर्मन, अशोक मंडल, शोएब शेख, पप्पू कुरेशी, अली शेख यांना अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी (Pune Police), कुरकुंभ, दिल्ली, सांगलीत छापे टाकून कारवाई केली होती. या प्रकरणाचे सूत्रधार सॅम ब्राऊन, संदीप धुनिया असल्याचे निष्पन्न झाले. (Sassoon Hospital)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community