गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ! अश्लील नृत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त मुद्द्यामुंळे चांगलीच चर्चेत आहे. गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला असून आता तिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सातारा न्यायालयाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

( हेही वाचा : देव तारी त्याला कोण मारी! प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्यामध्ये अडकला प्रवासी आणि….)

गौतमी पाटील अश्लील डान्स करते असा आरोप करत प्रतिमा शेलार यांनी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. आता या तक्रारीची दखल घेत सातारा न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तिच्या डान्समुळे महिलांच्या भावनाही दुखावल्या आहेत. लावणी ही लोककला आहे त्यामुळे लोककलेत अश्लीलता येत नाही. गौतमीने लावणीची संस्कृती जपली पाहिजे आणि अश्लीलपणा करू नये असे म्हणत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी गौतमीवर आरोप केले आहेत. तिच्या डान्स व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यानंतर तिच्यावर टीका करण्यात आली. कला क्षेत्रातील अनेक दिग्ग्जांनी सुद्धा गौतमीवर टीका केली होती, त्यानंतर गौतमीने जाहीर माफी मागितली होती. परंतु आता सातारा न्यायालयाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

कोण आहे गौतमी पाटील?

गौतमी पाटील ही सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. २६ वर्षीय गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलावण्यात येते. गौतमी कार्यक्रमासाठी भरगच्च मानधन घेते. परंतु अश्लील नृत्यामुळे तिच्यावर टीका करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here