मृत्यू की घातपात? सतीश कौशिक प्रकरणाला वेगळे वळण, हत्या केल्याचा दावा

चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. ६६ वर्षीय सतीश कौशिक यांचे मंगळवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. परंतु आता त्यांच्या मृत्यूप्रकरणी एका महिलेने खळबळजनक दावा केला आहे.

( हेही वाचा : रेल्वेमध्ये दर दिवसाला ११ अलार्म चेन पुलिंगची प्रकरणे)

या संबंधित महिलेने तिच्या पतीने सतीश कौशिक यांची १५ कोटींसाठी हत्या केली आहे अशी तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. दिल्ली पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये महिलेने हा खळबळजनक दावा केला आहे.

अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक हे त्यांनी दिलेले पैसे या महिलेच्या पतीकडून परत मागत होते. परंतु या महिलेचा पती हे पैसे परत देऊ इच्छित नव्हता असा आरोपही या महिलेने केला आहे. कौशिक यांची हत्या पतीनेच औषधे देऊन केली असेही तिने पोलिसात सांगितले आहे. सतीश कौशिक मृत्यूपूर्वी एका पार्टीत सहभागी झाले होते पोलिसांनी दिल्ली येथील फार्महाऊसमधून काही औषधे सुद्धा जप्त केली आहे.

या तक्रारदार महिलेने ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे. महिलेने यावेळी सांगितले की, सतीश कौशिक यांच्याशी पतीनेच ओळख करून दिली होती. कौशिक तिला भारत आणि दुबईमध्ये नेहमी भेटत होते आणि तिच्या पतीनेच कौशिक यांची पूर्वनियोजित हत्या केली आहे असा दावा या महिलेने केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here