धक्कादायक! शाळेत स्नेहसंमेलन सुरू असताना शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग

School teacher molested a minor girl in sangola school
धक्कादायक! शाळेत स्नेहसंमेलन सुरू असताना शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग

शिक्षकी पेशाला काळीमा लावणारी घटना सांगोल्यात घडली आहे. शाळेतील स्नेहसंमेलनात शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सांगोला तालुक्यातील कोळात गावाच्या शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

नक्की काय घडले? 

सोमवारी सांगोल्यातील कोळा गावातील एका प्रतिष्ठीत संस्थेच्या शाळेत स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हे स्नेहसंमेलन सुरू असताना आरोपी शिक्षकाने १४ वर्षीय मुलींवर विनयभंग केला. ही सर्व धक्कादायक घटना त्याच कॉलेजच्या प्राचार्यांनी बघितली. आणि तात्काळ मुलींच्या पालकांना व मुख्याध्यापकांना या घटनेबाबत सांगितले. मग संबंधित शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित शिक्षकाला अटक झाली असून त्याच्यावर पोक्सो कायदा आणि विनयभंगा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी न्यायालयात आज सुनावणी 

याप्रकरणी मंगळवारी (आज) आरोपी शिक्षकाला न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. तसेच शाळेच्या संस्थेनेही शिक्षकाविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या घटनेनंतर कोळा गावात एकच खळबळ माजली आहे.

(हेही वाचा – छोटा राजनचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी निलेश पराडकरसह १२ जणांवर गुन्हा दाखल)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here