एका व्यक्तीचं कार शिकणं दुसऱ्याच्या जीवावर बेतलं आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवीन स्कॉर्पिओ चालवायला शिकणाऱ्या चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने (Scorpio Car Accident) घटना घडली आहे. एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. (Scorpio Car Accident)
हेही पहा-Ladki Bahini Yojana : लाडकी बहीणींना फेब्रुवारीचा हफ्ता कधी मिळणार ? माहिती आली समोर
बिहारमधील (Bihar) दरभंगा (Darbhanga) इथे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्कॉर्पियोच्या धडकेत एक महिला जखमी झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच घटनास्थळावरुन पोलिसांनी स्कॉर्पियो ताब्यात घेतली आहे. (Scorpio Car Accident)
हेही पहा-महाराष्ट्राचा तुरुंग तहव्वूर राणासाठी तयार : CM Devendra Fadnavis यांची माहिती
या भीषण अपघातानंतर घटनास्थळी, तसंच संपूर्ण परिसरात वाहन मालकाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाची, तसंचं जखमी झालेल्या महिलेची ओळख पटली आहे. या अपघातानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी स्कॉर्पियो चालकाला घेरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तेथून पळ काढला. (Scorpio Car Accident)
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन मालक अमरनाथ भंडारी यांनी नवी स्कॉर्पियो खरेदी केली होती. शनिवारी सकाळी ते कार चालवण्याचं शिकत होते. याच वेळी त्यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांना चिरडलं. त्यानंतर कार एका वीजेच्या खांबाला धडक देऊन थांबली. (Scorpio Car Accident)
#दरभंगा जिले के कोतवाली क्षेत्र में रफ्तार के कहर ने दो लोगों को रौंद दिया है जिसमे एक व्यक्ति की मौत घटनास्थल पर ही हो गई जबकि दूसरी महिला का गम्भीर स्थिति में निजी अस्पताल में इलाज चल रहा है। घटना का CCTV वीडियो सामने आया है।#NBTBihar #DarbhangaAccident pic.twitter.com/68AX8HF3nR
— NBT Bihar (@NBTBihar) February 15, 2025
हेही पहा-
Join Our WhatsApp Community