Amol Kirtikar : खिचडी घोटाळ्यात लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांना ED कडून दुसरे समन्स

ईडीने सूरज चव्हाण यांची ८८.५१ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती, ज्यात मुंबईतील निवासी सदनिका आणि रत्नागिरीतील शेतजमिनीचा समावेश होता. या घोटाळ्यात ईडीकडून शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांचाही जबाबही नोंदवला गेला आहे.

221
Amol Kirtikar: शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांना पुन्हा ईडीचे समन्स

खिचडी घोटाळ्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे) गटाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना ईडीने दुसरे समन्स पाठवले आहे. ८ एप्रिल रोजी अमोल कीर्तिकर यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्समध्ये म्हटले आहे. अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना लोकसभेचे तिकीट जाहीर झाले त्यावेळी ईडीने पहिले समन्स पाठवुन ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु काही कारणास्तव कीर्तिकर हे ईडी कार्यालयात हजर राहू शकले नव्हते. (Amol Kirtikar)

शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना खिचडी घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी दुसरे पाठवले आहे. या समन्स मध्ये अमोल कीर्तिकर यांना ८ एप्रिल रोजी खिचडी प्रकरणात चौकशीकामी ईडी कार्यालयात हजर रहाण्यास सांगण्यात आले आहे. पहिल्या समन्स वेळी कीर्तिकर यांचे वकीलानी ईडी कार्यालयात हजर राहून अमोल कीर्तिकर हे पूर्व नियोजित कामामुळे ईडी कार्यालयात हजर राहू शकत नसल्याचा अर्ज देऊन त्यांना वेळ देण्यात यावा अशी विनंती अर्जात करण्यात आली होती. (Amol Kirtikar)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : राज्यातील ४८ पैकी २३ लढती झाल्या निश्चित; कोण आहे कोणासमोर पहा…)

खिचडी घोटाळ्यात ईडीने (ED) या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण, मनपा अधिकारी आणि निकटवर्तीयांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. दरम्यान ईडीने सूरज चव्हाण यांची ८८.५१ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती, ज्यात मुंबईतील निवासी सदनिका आणि रत्नागिरीतील शेतजमिनीचा समावेश होता. या घोटाळ्यात ईडीकडून शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांचाही जबाबही नोंदवला गेला आहे. संदीप राऊत यांनाही निधी मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. सह्याद्री रिफ्रेशमेंटने बीएमसीकडून मिळालेल्या पेमेंटचा काही भाग संजय राऊत यांच्या कुटुंबातील सदस्यांसह, त्यांचे भाऊ संदीप राऊत यांच्या खात्यात वळती केल्याचा आरोप आहे. (Amol Kirtikar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.