दीड हजार कोटींचे अमली पदार्थ करण्यात आले नष्ट

145
दीड हजार कोटींचे अमली पदार्थ करण्यात आले नष्ट
दीड हजार कोटींचे अमली पदार्थ करण्यात आले नष्ट

एनसीबी आणि डीआरआय या केंद्रीय तपास यंत्रणेने मुंबईसह राज्यात केलेल्या कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या दीड हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थांची नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी येथे नष्ट करण्यात आले आहे. मुंबई सीमा शुल्क प्रतिबंधक आयुक्तालयाच्या उच्चस्तरीय औषध निर्मूलन समितीच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी अमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. नष्ट करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये कोकेन, हेरॉइन, एमडी, गांजा, मेंडरेक्सच्या गोळ्या आणि एमडीएमए या प्रकारच्या अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, डीआरआय आणि मुंबई सीमा शुल्क विभागाने मुंबईसह राज्यभरात हजारो किलो अमली पदार्थ जप्त करून अनेक ड्रग्स माफिया, विक्रेते यांच्यावर वर्षाभरात करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यात कोकेन, हेरॉइन, एमडी, गांजा, मेंडरेक्सच्या गोळ्या आणि एमडीएमए याचा मोठा समावेश होता. जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ मुंबईतील विविध ठिकाणच्या गोदामात ठेवण्यात आले होते.

(हेही वाचा – Died : जमावाच्या मारहाणीत पोलीस अधिकाऱ्याच्या भावाचा मृत्यू; चोर समजून केली मारहाण)

दरम्यान डीआयआर, एनसीबी, आणि कस्टम विभागाने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून दीड हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी वित्त मंत्रालय, सरकारच्या निर्देशानुसार मुंबई सीमाशुल्क प्रतिबंधक आयुक्तालयाच्या उच्चस्तरीय औषध निर्मूलन समितीच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी या ठिकाणी दीड हजार कोटी किंमतीच्या अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. त्यात कोकेन ९ किलो ३५ ग्रॅम कोकेन, १६ किलो ६३३ ग्रॅम हेरॉईन, १९८ किलो एमडी, ३२.९१५ किलो गांजा, ८१.९१ किलो मेंडरेक्सच्या गोळ्या, एमडीएमच्या २९८ गोळ्याचा समावेश होता.

दोन महिन्यापूर्वीच मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने न्यायालयीन प्रक्रियेनंतर मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या नवी मुंबईतील तळोजा येथे २ हजार कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ नष्ट केले होते. तसेच डिसेंबर २०२२मध्ये सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच शहरातील विविध भागातून जप्त करण्यात आलेले ५३८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ तळोजा येथे नष्ट करण्यात आले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.