‘Book My Show’ची बनावट वेबसाईट तयार करून क्रिकेट सामन्याची तिकीटविक्री

या टोळीकडून बनावट वेबसाईटच्या आधारे संपूर्ण देशभरात आयपीएल क्रिकेट सामन्याची बनावट तिकिटांची विक्री करून क्रिकेटप्रेमींची फसवणूक करण्यात येत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

179
'Book My Show'ची बनावट वेबसाईट तयार करून क्रिकेट सामन्याची तिकीटविक्री

‘बुक माय शो'(Book My Show) च्या हुबेहूब बनावट वेबसाईटवर आयपीएल टी २० क्रिकेट सामन्याची ऑनलाईन बनावट तिकिटांची विक्री करणाऱ्या गुजरात राज्यातील टोळीचा मुंबई पोलिसांनी छडा लावला आहे. सायबर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या सीआययु यांनी केलेल्या एकत्रित कारवाईत सुरत येथून ६ जणांना अटक करण्यात आली. या टोळीकडून बनावट वेबसाईटच्या आधारे संपूर्ण देशभरात आयपीएल क्रिकेट सामन्याची बनावट तिकिटांची विक्री करून क्रिकेटप्रेमींची फसवणूक करण्यात येत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Book My Show)

खुशाल रमेशभाई डोबरिया (२४), भार्गव किशोरभाई बोर्ड (२२), वेब डेव्हलपर उत्तम मनसुखभाई भिमानी (२१), मोबाइल ॲप डेव्हलपर जस्मिन गिरधरभाई पिठाणी (२२), हिम्मत रमेशभाई अंताला (३५), निकुंज भूपतभाई खिमानी, अरविंदभाई चोटालिया (२५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे सर्व गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी आहे. ‘आयपीएल टी-२०’ सिझन २०२४ क्रिकेट सामने सुरू आहे. या सामन्याचे तिकीटांचा ऑनलाईन विक्रीचे हक्क ‘बुक माय शो डॉट कॉम’ (Book My Show) या वेबसाईटला देण्यात आलेले आहेत. क्रिकेट प्रेमींनी बुक केलेले आयपीएल क्रिकेट सामन्याचे तिकिटे बोगस असल्याच्या तक्रारी ‘बुक माय शो डॉट कॉम’ (Book My Show) या वेबसाईटवर येऊ लागल्या. (Book My Show)

(हेही वाचा – North Mumbai Lok Sabha : उत्तर मुंबईत महाविकास आघाडीचा उमेदवार घोसाळकर कुटुंबातीलच? : प्रभागांपासून प्रचाराला सुरुवात)

नंतर वेबसाईटने तिकिटांची खात्री केली असता बुक माय शो नावाने ‘बुक माय शो डॉट (Book My Show) क्लाउड/स्पोर्ट ही हुबेहूब बनावट वेबसाईट तयार करून या वेबसाईटवर आयपीएल टी२० ची बनावट तिकिटे विक्री केली जात असल्याचे समोर आले. या प्रकरणी दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सायबर पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या सीआययुच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करून सुरत येथून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. ही बनावट वेबसाइट सौदी येथून डिझाइन करण्यात आली असून या वेबसाईटचे सर्व्हर हॉंगकॉंग येथे असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच या वेबसाईटवरून संपूर्ण देशभरात बनावट तिकिटांची विक्री करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. (Book My Show)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.