हॉक्स कॉलरमुळे मुंबई पोलीस नियंत्रण कक्षातील कर्मचारी हैराण झाले आहेत. मागील काही महिन्यांत हॉक्स कॉल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली असतानाच गुन्हे शाखेने मुंबईतील मालवणी परिसरातून एका सिरीयल हॉक्स कॉलरला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या हॉक्स कॉलरने मागील पाच महिन्यात मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जवळपास ८० वेळा कॉल करून खोटी माहिती दिल्याचे चौकशीत समोर आले आहे.
रुखसार अहमद असे या हॉक्स कॉलरचे नाव आहे. मालाड मालवणी परिसरात राहणारा रुखसार हा व्यवसायाने शिंपी आहे. त्याने शनिवारी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कॉल करून “बडा बॉसने मुंबईत एका ठिकाणी १०० किलो स्फोटके ठेवली आहेत आणि या स्फोटकांनी तो शहर उडवून देणार आहे” हा कॉल मालाडच्या मालवणी परिसरातून करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. या हॉक्स कॉलरला शोधण्यासाठी गुन्हे शाखा आणि मालवणी पोलिसांनी मालवणी परिसरात कॉलरचा शोध घेत त्याचे घर गाठले मात्र तो घरी सापडला नाही.
(हेही वाचा – Amit Shah : …तर संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार असू – अमित शाह)
अखेर गुन्हे शाखेने त्याचा मोबाईल फोन ट्रॅकिंगवर ठेवला असता रुखसार अहमद हा मुंबई विमानतळ परिसरात असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखा कक्ष १०च्या पथकाने रविवारी विमानतळ परिसरातून त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याचा मोबाईल फोन ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करून फोनच्या कॉल डिटेल्सची माहिती काढण्यात आली असता रुखसार याने मागील पाच महिन्यात मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला तब्बल ८० खोटे कॉल करून वेगवेगळ्या प्रकारची माहिती देऊन नियंत्रण कक्षातील पोलिसांना हैराण करून सोडले होते. नियंत्रण कक्षाला कॉल करून त्रास देण्यामागे रुखसारचा उद्देश काय होता याबाबत अद्याप काही स्पष्ट होत झालेले नाही. तपास पथकाने त्याची चौकशी केली असता तो पोलिसांना व्यवस्थित उत्तर देत नसल्यामुळे मानसिक स्थिती तपासली जाणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community