शहरासह उपनगरात महिला आणि मुलींची छेड काढून त्यांचा विनयभंग करणाऱ्या एका ‘सिरीयल मॉलस्टर’ला जुहू पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. १८ पेक्षा अधिक विनयभंगाचे गुन्हे दाखल असलेला ३१ वर्षीय कल्पेश देवघरे हा नुकताच एका गुन्ह्यातून जामीनावर बाहेर आला होता.
जुहू पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात पोलिसांनी त्याला नुकतीच चर्नी रोड येथून अटक केली आहे. कल्पेश हा पेशाने वाहन चालक आहे. महाविद्यालय, शाळा आणि शिकवणी परिसरात दबा धरून कल्पेश हा १५ ते २० वयोगटातील मुलींना लक्ष करीत होता. कल्पेश याच्यावर मुंबईतील डीएन नगर, अंधेरी, दिंडोशी, कांदिवली, पंत नगर आणि गोरेगाव येथील पोलीस ठाण्यात विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.
(हेही वाचा – Game Jihad: गेमद्वारे धर्मांतरण प्रकरणात मास्टर माईंड शाहनवाज खानला अलिबागमधून अटक)
नुकताच दाखल झालेल्या एका गुन्ह्यात जुहू पोलीस त्याचा शोध घेत होते. कल्पेश हा चर्नीरोड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community