मुलगी जन्माला आली म्हणून साडी आणि खणा-नारळ मागण्यासाठी गेलेल्या तृतीय पंथीयाला हाकलून लावण्यात आले होते. या घटनेचा सूड उगवण्यासाठी एका तृतीय पंथीयाने या कुटुंबाचा सूड उगवायचे ठरवले. त्यासाठी त्याने याच कुटुंबातील ३ महिन्याच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी सत्र न्यायालयाने (Sessions Courts) या तृतीय पंथीयाला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना दक्षिण मुंबईतील कफ परेड (cuffe pared) येथे घडली.
कन्हैया उर्फ कन्नु दत्ता चौघुले (२४) असे या तृतीयपंथीचे नाव आहे. कन्हैया हा तृतीय पंथीय कफपरेड येथील आंबेडकर नगर झोपडपट्टीमध्ये राहात होता. त्याच परिसरात पीडित आणि बळी गेलेल्या मुलीचे कुटुंब आहे. या कुटुंबात एप्रिल २०२१ मध्ये मुलगी जन्मला आली होती. ही मुलगी ३ महिन्यांची झाली. तेव्हा कन्हैयाने त्याचा पूर्वी झालेल्या अपमानाचा सूड घ्यायचे ठरवले. ८ जुलैला रात्रीच्या सुमारास ३ महिन्यांच्या या चिमुरडीला आईच्या कुशीतून उचलून त्याने या मुलीचे अपहरण केले. तिच्या पालकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी कफ परेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
(हेही वाचा – Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या व्यासपिठावर ओवैसीची भाषा; विनोद शेलार यांचा व्हिडिओ व्हायरल)
पोलिसांनी संशयावरून कन्हैया तृतीयपंथीला ताब्यात घेतले
कफ परेड पोलिसांनी संशयावरून कन्हैया तृतीयपंथीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानेच मुलीचे अपहरण करून तीला एका ठिकाणी पुरल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. तेव्हा या मुलीवर लैगिंग अत्याचार करून खून (rape with murder) करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. कफ परेड पोलिसांनी (Cuffe Pared) कन्हैया उर्फ कन्नु दत्ता चौघुले यांच्या विरुद्ध अपहरण, हत्या, लैगिंग अत्याचार, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, पोक्सो या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी चिमुरडीचे अपहरण
कन्हैया उर्फ कन्नु दत्ता चौघुले हा तृतीयपंथी असून ज्या दाम्पत्याला मुले झाली त्याच्या घरी जाऊन पैसे आणि साडी चोळी मागणे व नुकत्याच जन्मलेल्या मुलांना आशीर्वाद देणे, हे काम कन्हैया करीत होता. बळी गेलेल्या मुलीच्या कुटुंबाकडे कन्हैया घटनेच्या काही दिवसांपूर्वी गेला होता, त्याने या कुटुंबाकडे पैसे आणि साडी चोळी मागितली, परंतु कुटुंबांनी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांनी देण्यास नकार दिला होता. या रागातून कन्हैयाने या कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी चिमुरडीचे अपहरण करून तिचा खून केला. हा खटला सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती ए. यु .कदम यांच्या न्यायालयात सुरू होता, आरोपी विरुद्ध असलेल्या सबळ पुरावे,तांत्रिक पुरावे, साक्षीदार,फॉरेन्सिक अहवालावरून आरोपी कन्हैया विरुद्ध आरोप सिद्ध होऊन सत्र न्यायालय अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती ए. यु .कदम यांनी आरोपी कन्हैया उर्फ कन्नु दत्ता चौघुले याला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा (Death Penalty) सुनावण्यात आली . न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुलीला खरा न्याय मिळाल्याचे मत व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community