Sessions Judge Suspended : तेलंगणामध्ये सत्र न्यायाधीश निलंबित, कारण…

131
Sessions Judge Suspended : तेलंगणामध्ये सत्र न्यायाधीश निलंबित, कारण...
Sessions Judge Suspended : तेलंगणामध्ये सत्र न्यायाधीश निलंबित, कारण...

महबूबनगरचे आमदार श्रीनिवास गौड यांनी त्यांनी तेलंगणाच्या 2018 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली होती. या प्रकरणी सत्य दडपून निवडणूक प्रतिज्ञापत्रात छेडछाड केल्याचा आरोप असलेली तक्रार सत्र न्यायालयाकडे करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास विनाकारण घाई केल्याचा ठपका विशेष सत्र न्यायाधीश के. जया कुमार यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय युनिटने विशेष सत्र न्यायाधीश के. जया कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Arogya Aadhar app: धर्मादाय रूग्णालयांची अद्ययावत माहिती “आरोग्य आधार’ ॲपवर)

आमदार श्रीनिवास गौड यांच्या विरोधातील तक्रार मिळाल्यानंतर विशेष सत्र न्यायाधीश के. जयकुमार यांनी पोलिसांना या प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. एवढेच नाही, तर 12 ऑगस्ट रोजी जयकुमार यांनी पोलिसांना इशारा दिला होता की, त्या दिवशी दुपारी 4 वाजण्यापूर्वी गुन्हा नोंदवला नाही, तर पोलिसांवर अवमानाचा गुन्हा दाखल केला जाईल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि इतर अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या संगनमताने प्रतिज्ञापत्राच्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न करता प्रकरण गुंडाळल्याचा आरोप आहे. आरोपींमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य अधिकारी यांचा समावेश आहे.

निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यानंतर  विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कुमार यांच्यावर प्रशासकीय पातळीवर निलंबनाची कारवाई सुरू झाली. तेलंगणा नागरी सेवा नियम 1991 अन्वये न्यायाधीश के. जय कुमार यांना निलंबित करण्यात आले. सत्र न्यायाधीशांनी कोणतेही कारण नसताना घाईघाईने निर्णय घेतल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायाधीशांनी आपले कर्तव्य बजावण्यात गंभीर चूक केली आहे.

निलंबित न्यायाधीश शहर सोडून जाऊ शकणार नाहीत

तेलंगणा उच्च न्यायालयानेही न्यायाधीशांना परवानगीशिवाय हैदराबाद सोडू नये, असे आदेश दिले आहेत. जय कुमार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. जय कुमार यांच्या जागी या प्रकरणाची सुनावणी हैदराबाद महानगर सत्र न्यायाधीश करतील.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.