Sexual Assault : स्मृतिभ्रंश असलेल्या वृद्ध महिलेवरील अत्याचाराची घटना सीसीटीव्हीमुळे आली उघडकीस; एका आरोपीला अटक

86
Sexual Assault : स्मृतिभ्रंश असलेल्या वृद्ध महिलेवरील अत्याचाराची घटना सीसीटीव्हीमुळे आली उघडकीस; एका आरोपीला अटक
  • प्रतिनिधी 

गोरेगाव पूर्व येथे घरात एकट्या राहणाऱ्या ७५ वर्षीय स्मृतिभ्रंश महिलेवर २० वर्षाच्या तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शेजारीच राहणाऱ्या पीडित महिलेच्या मुलीने आईवर लक्ष ठेवण्यासाठी घरात बसवलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा प्रकार समोर आला आहे. मुलीने तात्काळ दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Sexual Assault)

(हेही वाचा – Walkeshwar Banganga : बाणगंगा परिसरातील आरतीला होत आहे विरोध; व्यवस्थापन घेणार पोलीस अधिकाऱ्यांची भेट)

पीडित वयोवृद्ध असून गोरेगाव पूर्व येथे घरात एकट्याच राहण्यास आहे. त्यांना एक मुलगी असून ती विवाहित आहे आणि त्याच परिसरात राहण्यास आहे. पीडितेचा सांभाळ मुलगी करते. पीडित महिलेला स्मृतिभ्रंशचा आजार असून ती कुणालाही न सांगता घरातून निघून जाते म्हणून मुलीने आईवर लक्ष राहावे म्हणून घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. १२ जानेवारी रोजी मुलीने आईच्या घरातील सीसीटीव्हीचे जुने फुटेज तपासत असताना ८ जानेवारी रोजी एक अनोळखी आईच्या खोलीत संशयास्पद हालचाली करीत असल्याचे आढळून आले. (Sexual Assault)

(हेही वाचा – Republic Day : कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख करणार ध्वजावर पुष्पवृष्टी)

मुलीने संपूर्ण फुटेज तपासले असता हा अनोळखी इसम आईवर लैंगिक अत्याचार करीत असल्याचे आढळून आले. हा प्रकार बघून पीडितेच्या मुलीला धक्काच बसला. तिने आईला विचारण्याच्या प्रयत्न केला मात्र पीडितेला काहीही आठवत नसल्यामुळे मुलीने तात्काळ दिंडोशी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेऊन त्याला त्याच परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपी हा त्याच परिसरातील राहण्यास असून तो मागील।काही दिवसांपासून पीडित वृद्धेच्या घराभोवती फिरत असल्याचे आढळून आले आहे. आजूबाजूला कोणीही नसल्याचे बघून ८ जानेवारी रोजी त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. (Sexual Assault)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.