Sexual assaulted : पुण्यात ६७ वर्षांच्या नराधमाने १० वर्षांच्या मुलीचा केला लैंगिक छळ

300
Sexual assaulted : पुण्यात ६७ वर्षांच्या नराधमाने १० वर्षांच्या मुलीचा केला लैंगिक छळ
Sexual assaulted : पुण्यात ६७ वर्षांच्या नराधमाने १० वर्षांच्या मुलीचा केला लैंगिक छळ

बदलापूर येथील चिमुरडीवर अत्याचाराच्या घटनेनंतर (Badlapur School Case) राज्यभरात आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. या घटनेनंतर राज्यातील अनेक भागातील महिला आणि लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर येताना दिसत आहे. दरम्यान बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील खडकवासला (Pune Khadakwasla) परिसरातील एका शाळेत ‘गुड टच, बॅड टच’ (Good touch, bad touch) उपक्रमाद्वारे विद्यार्थींनींना माहिती दिली जात होती, मुलींना सजग करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान एका दहा वर्षीय मुलीने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराला वाचा फोडली. ६८ वर्षाच्या नराधमांने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने सांगितले. यामुळे खडकवासला परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Sexual assaulted)

(हेही वाचा – ९५ टक्‍के Hindu असलेले गोविंदपूर गाव रिकामे करण्‍याचा Waqf Board चा आदेश)

दिलीप नामदेव मते (Dilip Namdev Mate) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला परिसरातील १० वर्षाची पीडित मुलगी शुक्रवारी ११ वाजण्याच्या सुमारास शाळेत जात होती. त्यावेळी आरोपी दिलीप मते याने तिला खाऊसाठी पैसे देतो असे आमिष दाखवून जवळच्या एका खोलीत नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्या घटनेबाबत पीडित मुलीने घरी कोणालाही सांगितले नाही.  (Sexual assaulted)

(हेही वाचा – Jammu-Kashmir Assembly Election : भाजपाचे जम्मू-काश्मीरसाठी ‘मिशन ६६’)

दुसर्‍या दिवशी पीडित मुलगी शाळेत गेल्यावर शाळेमध्ये ‘गुड टच, बॅड टच’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिक्षकांनी प्रत्येक मुलीशी संवाद साधत होते. त्या दरम्यान पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितल्यावर आरोपी दिलीप मते याच्या विरोधात हवेली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. दरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास हवेली पोलिस करत आहेत. (Sexual assaulted)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.