Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरण; गणेश मारणे, विठ्ठल शेलारांसह 16 जणांवर मोक्का

Sharad Mohol Murder case : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) लावण्यात आला आहे.

185
Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरण; गणेश मारणे, विठ्ठल शेलारांसह 16 जणांवर मोक्का
Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरण; गणेश मारणे, विठ्ठल शेलारांसह 16 जणांवर मोक्का

पुण्यातील शरद मोहोळ (Sharad Mohol Murder) हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) लावण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून यासंदर्भात आदेश जारी करण्यात आला आहे. 5 जानेवारी रोजी कोथरुडमध्ये मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी पिस्तुलातून गोळ्या झाडत शरद मोहोळ याचा खून केला होता. (Sharad Mohol)

(हेही वाचा – Reliance Industries Share: रिलायन्सच्या शेअर्सनी गाठला विक्रमी उच्चांक, मार्केट कॅपमध्ये किती टक्क्यांची वाढ झाली; वाचा सविस्तर)

या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे करत आहेत.

पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. भर दिवसा झालेल्या या हत्येने पुण्यात खळबळ माजली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार नीतेश राणे यांनी शरद मोहोळ यांच्या पत्नीची भेट घेऊन सांत्वन केले होते.

(हेही वाचा – Aus Vs WI 2nd Test : दुसऱ्या कसोटीत विंडिजचा ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी ऐतिहासिक विजय)

पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्येप्रकरणी आतापर्यंत 24 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Sharad Mohol)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.