Share Market Fraud : शेअर बाजाराच्या नादात व्हॉटस्अपच्या ग्रुपमध्ये अॅड केले अन् ३४.६२ लाख रुपयांना फसवले

471
Share Market Fraud : शेअर बाजाराच्या नादात व्हॉटस्अपच्या ग्रुपमध्ये अॅड केले अन् ३४.६२ लाख रुपयांना फसवले
Share Market Fraud : शेअर बाजाराच्या नादात व्हॉटस्अपच्या ग्रुपमध्ये अॅड केले अन् ३४.६२ लाख रुपयांना फसवले

शेअर मार्केटमध्ये (Share Market Fraud) मोठ्या आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून ऑनलाइन (Online Fraud) पद्धतीने लाखो रुपये बँक खात्यातून परस्पर लांबवणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीनं आता फसवणुकीचा नव-नवे  ट्रेंड शोधले आहेत. अशीच एक घटना ठाणे परिसरात घडली असून, या घटनेत शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून खोपटमधील रवीराज साळुंके (Raviraj Salunke) (५४) या व्यावसायिकाला ३४ लाख ६२ हजारांचा आॅनलाईन गंडा घालण्यात आला. यासाठी भामट्यांनी साळुंकेला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये (Share Market Whatsapp Group) सहभागी केले होते. दरम्यान या प्रकरणी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी रविवारी (२८ जुलै) दिली. एकाच आठवड्यात ठाणे शहरात अशा प्रकारे फसवणुकीचे चार प्रकार घडल्याचे समोर आले आहे. (Share Market Fraud)

(हेही वाचा – Award Ceremony : मोघलांना भिडणारे मावळे तयार करण्याचे काम करतोय; सुनील पवार यांचे उद्गार)

अशी झाली घटना

साळुंके याला ४ ते १० जुलै २०२४ या कालावाधीमध्ये एका अनोळखी मोबाईलधारकाने व्हॉटसअॅपवर मेसेज करून गोल्डमन सॅक इनव्हेस्टमेंट सेक्युरिटीजच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले. याच ग्रुपद्वारे शेअर्स मार्केटमध्ये (share market) गुंतवणूक केल्यास मोठ्या रकमेचा परतावा मिळेल, असे त्याला आमिष दाखवण्यात आले. गुंतवणुकीसाठी भामट्याने साळुंकेकडून ३४ लाख ६२ हजारांची रक्कम ऑनलाईन घेतली. बरेच दिवस झाले तरी प्रत्यक्षात त्याला कोणताही जादा परतावा किंवा त्यांनी गुंतवलेली मुद्दलची रक्कम दिली नाही.  (Share Market Fraud)

(हेही वाचा – Home Guard भरती सुरू; कुठे आणि कसा कराल अर्ज?)

साळुंकेने वारंवार पाठपुरावा केला तरी ग्रुपमध्ये कोणीही प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने नौपाडा पोलिसांत तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायदा कलम ३१८ (४) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा कलम ६६ (क), ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Share Market Fraud)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.