शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्याकांडामध्ये (Shiv Sena Municipal Councillor Kamlakar Jamsandekar Murder Case Life Imprisonment) जन्मठेपेची शिक्षा झालेला अरुण गवळी टोळीचा शार्पशूटर नरेंद्र गिरी (Gangster Arun Gawali gang Sharp Shooter Narendra Giri) याला नवी मुंबईतील घणसोली येथून मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) कक्ष ३च्या पथकाने अटक केली होती. (Mumbai Crime Branch Unit 3) नरेंद्र गिरी हा कोल्हापूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना २ महिन्याच्या संचित रजेवर (patrol Jump) आला होता, त्यानंतर तो पुन्हा तुरुंगात न जाता त्याने महाराष्ट्रातुन पलायन केले होते अशी माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Mumbai Crime Branch)
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची २ मार्च २००७ रोजी त्यांच्या असल्फा व्हिलेज, साकिनाका येथील घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. (Shiv Sena Municipal Councillor Kamlakar Jamsandekar Murder Case) संपत्तीच्या वादातून सदाशिव सुर्वे याने गँगस्टर अरुण गवळी याला जामसांडेकर यांच्या हत्येची ३० लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. गवळी याने या हत्येची जवाबदारी प्रताप गोडसे याच्यावर सोपवली होती. प्रताप गोडसे याने कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येसाठी नरेंद्र गिरी आणि विजयाकुमार गिरी या दोन शार्प शूटर ची निवड करण्यात आली होती. या हत्याकांडात मुंबई गुन्हे शाखेकडून जवळपास दोन डझन जणांना अटक करण्यात आली होती. (Mumbai Crime Branch)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : आढळराव राष्ट्रवादीत तर बारणे भाजपमधून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या सेनेत आणखी राजकीय पेच वाढणार )
अशा प्रकारे नरेंद्र गिरीला घेण्यात आले ताब्यात
या गुन्ह्यात दगडी चाळीचा डॉन गँगस्टर अरुण गवळी (Dagdi Chawl Gangster Arun Gawali) याच्यासह १२ जणांना न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात (Life Imprisonment) आलेल्या अरुण गवळी सह १२ ही गुंडांची राज्यातील वेगवेगळ्या तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. यापैकी शार्पशूटर नरेंद्र लालमणी गिरी (३६) हा कोल्हापूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. (Kolhapur jail) गेल्यावर्षी ११ नोव्हेंबर २०२३ मध्ये नरेंद्र गिरी याला ३१ जानेवारी २०२४ पर्यत संचितरजा देण्यात आली होती. १ फेब्रुवारी रोजी गिरीला पुन्हा कोल्हापूर तुरुंगात हजर व्हायचे होते परंतु तो तुरुंगात न जाता त्याने महाराष्ट्राच्या बाहेर पळ काढला होता. याप्रकरणी कोल्हापूर तुरुंग प्रशासनाने नवी मुंबईतील तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. (Mumbai Crime Branch)
गिरी याच शोध घेण्यात येत असताना नरेंद्र गिरी हा नवी मुंबईतील घणसोली येथे एकाला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) कक्ष ३चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या पथकाला मिळाली होती. पोलीस उपायुक्त (गुन्हे) दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे, पो. उपनिरीक्षक इंद्रजित शिरसाठ, अंमलदार. आकाश मांगले, राहुल अनभुले, सुहास कांबळे, भास्कर गायकवाड आणि शिवाजी जाधव या पथकाने बुधवारी रात्री घणसोली येथे सापळा रचून नरेंद्र गिरी याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी नरेंद्र गिरी याला तुर्भे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. (Mumbai Crime Branch)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community