तरुणांमध्ये अल्पावधीत प्रसिद्ध झालेला मांसाहारी खाद्यपदार्थ ‘शोरमा’ खाल्ल्यामुळे गोरेगाव आणि मानखुर्द येथे अनेकांना विषबाधा होऊन त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. शोरमासाठी वापरण्यात येणारे चिकन हे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. मुंबईसह राज्यातील काही शहरांमध्ये रस्त्यांवर विकला जाणारा ‘शोरमा’ हा खाद्यपदार्थ एफडीएच्या (FDA) रडारवर आला आहे. रस्त्यांवरील शोरमाची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एफडीएने (FDA) विशेष पथक तयार केले असून या कारवाईसाठी मुंबई पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. (FDA)
‘शोरमा’ हा खाद्यपदार्थ भारतातील नसून तो अरब देशातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. मागील काही वर्षांपूर्वी शोरमा हा खाद्यपदार्थ भारतात दाखल झाला आणि अल्पवधीतच या खाद्यपदार्थाने तरुणांच्या जिभेचा ताबा घेतला. मुंबई, ठाणे सारख्या शहरात मांसाहारी असलेल्या शोरमा पदार्थाने तरुणासह अनेकांच्या जिभेचा ताबा घेतला असून मुंबई, ठाण्यात नाक्या-नाक्यांवर शोरमाचे बेकायदेशीर स्टॉल उभे राहिले. शोरमा खाण्यासाठी सायंकाळपासून ते मध्यरात्रीपर्यंत खवय्यांची गर्दी शोरमा स्टॉलबाहेर जमा होते. (FDA)
(हेही वाचा – बाळासाहेबांचे विचार सोडलेले उबाठा काँग्रेसमध्ये आधीच विलीन झाला; CM Eknath Shinde यांची घणाघाती टीका)
मनपा आणि अन्न व औषध प्रशासन झाले सतर्क
मुंबईतील झोपडपट्टी वस्त्यांमध्ये शोरमाचे बेकायदेशीर स्टॉल मोठ्या प्रमाणात असून स्वस्त दरात मिळणाऱ्या या शोरमामध्ये निकृष्ट दर्जाचे चिकन आणि त्यात लागणारे इतर पदार्थदेखील निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहेत. तसेच शोरमासाठी लागणारे मसालेदार चिकन हे दोन ते तीन दिवस वापरले जात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. मागील आठवड्यात गोरेगाव येथे १२ जणांना शोरमा खाऊन उलट्या आणि अतिसाराचा त्रास होऊन त्यांची प्रकृती खालावली होती. या घटनेला आठवडा उलटत नाही तोच मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे शोरमा खाल्ल्याने दोन जणांना त्रास झाला, त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले असता त्यात एकाचा मृत्यू झाला. (FDA)
ट्रॉम्बे पोलिसांनी याप्रकरणी शोरमा विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली आहे. या घटनेनंतर मुंबई महानगरपालिका, अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले आहे. रस्त्यावर बेकायदेशीररित्या शोरमा विक्री करणाऱ्यांकडे कुठल्याही प्रकारची परवानगी किंवा खाद्यपदार्थ परवाने नाही. निकृष्ट दर्जाच्या शोरमा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी एफडीए (FDA) पुढे आले आहे. पोलीस आणि मनपाच्या मदतीने एफडीएकडून बेकायदेशीर शोरमा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. (FDA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community