Beef Consumption : कर्मचारी रईस आणि रिझवानवर हॉटेलमध्ये गोमांस खाल्ल्याचा आरोप, हिंदू संघटना संतप्त

208
Beef Consumption : कर्मचारी रईस आणि रिझवानवर हॉटेलमध्ये गोमांस खाल्ल्याचा आरोप, हिंदू संघटना संतप्त
Beef Consumption : कर्मचारी रईस आणि रिझवानवर हॉटेलमध्ये गोमांस खाल्ल्याचा आरोप, हिंदू संघटना संतप्त

शिमला (Shimla Hotel) येथे मशिदीविषयी सुरु असलेला वाद संपलेला नसताना नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिमल्यातील एका हॉटेलमध्ये ग्राहकांना गोमांस खाऊ घातल्याच्या (Beef Consumption) आरोपामुळे तेथील वातावरण अजूनच चिघळले आहे. दि. ५ ऑक्टोबरला प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते कमल गौतम यांनी एक्सद्वारे २ व्हिडिओ प्रसिद्ध केले. तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.

( हेही वाचा : Rahul Gandhi यांच्या ‘दलित किचन’ व्हिडिओला जातिभेदाची किनार! नेटकऱ्यांनी केले ट्रोल !! )

हॉटेल ‘होम स्टे राज व्हिला’ हे शिमल्यातील जुन्या बस स्थानकाजवळ आहे. या हॉटेलमधील एका हिंदु (Hindu) कर्मचाऱ्याने याप्रकरणी पोलिसात तक्रार केली आहे. याठिकाणी मुस्लिम समाजातील काही कर्मचारी हॉटेलमध्ये गोमांस (Beef Consumption) आणून खात होते, असे तक्रारीत म्हटले आहे. रईस खान आणि रिझवान याच्यावर गोमांस खात (Beef Consumption) असल्याचा आरोप असून ते काश्मीरचे रहिवाशी आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. दरम्यान रईस आणि रिझवान याच्या विरोधातील रोष पाहून मालकाने त्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे.

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.