मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. मुंबईच्या पाचही सहपोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी अडीच वर्षे पार पाडणारे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालकपदी बदली करण्यात आली आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार नागरे पाटील यांना नवी मुंबई किंवा पुणे आयुक्तपदी नियुक्ती अपेक्षित होती, परंतु गृह विभागाने त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची अपर पोलीस महासंचालकाची जबाबदारी दिली.मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखा हे देखील महत्वाचा विभाग असून या विभागाचे सहपोलीस आयुक्त सुहास वारके यांची देखील बदली करण्यात आली असून लखमी गौतम यांच्या खांद्यावर मुंबई गुन्हे विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सहपोलिस आयुक्त ( प्रशासन)म्हणून जयकुमार यांची वर्णी लागली आहे.
(हेही वाचा मुंबईसह राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल, एटीएस प्रमुखपदी सदानंद दाते)
आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांची मुंबई पोलीस वाहतूक विभागाच्या सहपोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली असून आर्थिक गुन्हे शाखेच्या सहपोलिस आयुक्तपदी निशीत मिश्रा यांची वर्णी लागली आहे.
Join Our WhatsApp Community