एनआयए आणि राज्य एटीएसने पुणे मुंबईत केलेल्या कारवाईत आयएसआयचा मोठा कट उधळून लावत जवळपास डझनभर संशयित दहशतवाद्यांना वेगवेगळ्या शहरातून अटक करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) हा संपूर्ण तपास स्वतःकडे घेऊन या प्रकरणात संशयित आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात जवळपास ४ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात धक्कादायक अशी माहिती समोर येत असून बॉम्ब तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामुग्रीला कोडवर्ड देण्यात आले होते असे नमूद करण्यात आले आहे. (Bomb Making Codewords)
एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुणे आयएसआय मॉड्युलने यावेळी पुण्याला लक्ष करून साखळी बॉम्ब स्फोट घडवून आणण्याची योजना आखली होती अशी माहिती समोर आली. बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षणा पासून बॉम्ब स्फोट घडवून आणण्याचे प्रशिक्षण अटकेत असणाऱ्या संशयितांना देण्यात आले होते असेही आरोपपत्रात नमूद करण्यात आले आले. (Bomb Making Codewords)
(हेही वाचा – Jet Airways : भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या लढ्याला यश; जेट एअरवेज कामगारांना २० वर्षांनंतर न्याय)
बॉम्ब तयार करणारी सामुग्री काही प्रमाणात जप्त करण्यात आली होती. त्यासाठी संशयित दहशतवादी मॉड्युलने या सामुग्रीला कोडवर्ड दिले होते. सल्फ्यूरिक ऍसिडसाठी ‘शिरका’, एसीटोनसाठी ‘गुलाब पाणी’ आणि हायड्रोजन पेरॉक्साइडसाठी ‘शरबत’ असे कोड शब्द वापरण्यात आल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. (Bomb Making Codewords)
एनआयएच्या आरोपपत्रात एका साक्षीदाराचे म्हणणे आहे, ज्याने २०११-१२ मध्ये दुसर्या एका प्रकरणात अटक केलेल्या शेखच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. साक्षीदाराने असा ही दावा केला की, २०१४ मध्ये शेखने त्याला ‘युनिटी इन मुस्लिम उम्मा’ आणि ‘उम्मा न्यूज’ नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले होते. त्या ग्रुपमध्ये कोडवर्डचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता त्यात बॉम्ब बनविण्यासाठी लागणाऱ्या सामुग्रीला हे कोडवर्ड देण्यात आले होते. (Bomb Making Codewords)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community