श्रद्धाच्या मृतदेहाचे १७ तुकडे, तर चेहरा जाळण्यासाठी लेझर टॉर्चचा वापर! आफताबची आरोपपत्रात कबुली

135

दिल्ली हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात आफताब अमिन पूनालाविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यात १८ मे रोजी श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे १७ तुकडे केले आणि ते फ्रिजमध्ये तसेच कपाटात लपवून ठेवल्याचे आफताबने म्हटले आहे.

( हेही वाचा : Indian Railway : ट्रेनमध्ये जनरल डबे पुढे किंवा शेवटीच का असतात? काय आहे खरे कारण?)

आफताबने दिली कबुली 

श्रद्धा आफताबच्या भांडणाचे मुख्य कारण म्हणजे आफताबची अनेक मुलींसोबत मैत्री होती. दुबईपर्यंतच्या मुलींसोबत आफताब संपर्कात होता. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार आफताबने मार्बल कटिंग मिक्सर ग्राइंडरने श्रद्धाची अनेक हाडे बारीक केली आणि नंतर पावडर बनवून फेकून दिली. तिचे केस आणि चेहरा खराब करण्यासाठी लेझर टॉर्चचा वापर करण्यात आला होता. हत्येनंतर ३ महिन्यांनी त्याने डोक्याचा भाग फेकून दिला होता. आफताबने ही धक्कादायक कबुली दिली आहे.

दिल्लीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. हत्येनंतर आफताबने हत्यारे, पाण्याच्या बाटल्या, कोरडा बर्फ, नवीन फ्रिज खरेदीच्या तपशीलाचाही आरोपपत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.