- प्रतिनिधी
दक्षिण मुंबईतून अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी (Bangladeshi Infiltrators) नागरिकांनी राज्यात झालेल्या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांमध्ये बोगस मतदान केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. अटक करण्यात आलेल्या ६ घुसखोर बांगलादेशींपैकी ४ जणांकडून भारतीय नागरिक असल्याची बनावट कागदपत्रे देखील आढळून आली आहेत. मोहिन हयात बादशाह शेख (५१), रुबीना अबूहसन शेख, मोहम्मद बिलप मोहम्मद सहाबुद्दीन शेख, मोहम्मद मसुद मतीन रेहमान राणा, युनूस आक्काश शेख आणि ताहीर गफुर शेख या सहा जणांना मुंबईतील विविध भागांतून अटक करण्यात आली आहे. मोहीन हयात शेख याला कफ परेड पोलिसांनी अटक केली असून रुबिना अबुहसन शेख (३६) हिला मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरीत ४ जणांना ओशिवरा, ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे. कफ परेड पोलिसांनी आंबेडकर नगर येथून अटक करण्यात आलेला मोहित हयात बादशाह शेख याने बांगलादेशातून मुंबईमध्ये १९९९ मध्ये घुसखोरी केली होती. (Crime)
(हेही वाचा – विमानतळाची नवीन धावपट्टी महिनाभरात पूर्ण करा; केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांचा कंत्राटदारांना आदेश)
रुबिना अबुहसन शेख ही सन २००० मध्ये भारतात घुसखोरी करून आली होती. मोहिन हयात बादशाह शेख (५१) हा बांगलादेशातील चितगावचा राहणारा असून तो अवघ्या १७ वर्षांचा असताना त्याने अवैधरित्या भारतात घुसखोरी केली होती. तेव्हापासून, शेखने आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांसारखी महत्त्वाची भारतीय कागदपत्रे मिळवली आहेत आणि भारत आणि बांगलादेश दरम्यान अनेक दौरे केले आहेत. शेख यांच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार कार्ड आणि ड्रायव्हरचा परवाना असल्याचे पोलिसांनी सांगितले. शेख हा मुंबईतील मुंब्रा, कुर्ला, गोवंडी आणि परळमधील मुलांना उर्दू आणि कुराण शिकवत होता. त्यानंतर तो दक्षिण मुंबईतील कफ परेड येथे राहण्यास आला होता. कफ परेडमध्ये तो बड्या हॉटेलमध्ये मौलाना म्हणून परदेशातून येणाऱ्या मुस्लिमासोबत नमाजमध्ये सहभागी होत असे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोईन हयात बादशाह शेख या घुसखोर बांगलादेशी (Bangladeshi Infiltrators) नागरिकाने लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदान केले असल्याची धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली आहे. (Crime)
(हेही वाचा – Bangladesh मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकाचा अपमान; गळ्यात घातला चपलांचा हार)
त्याच्याकडे बांगलादेशी राष्ट्रीय ओळखपत्र आणि जन्म प्रमाणपत्र देखील होते परंतु त्याच्याकडे भारताचा पासपोर्ट नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मोईन याची पत्नी बांगलादेशात असून त्याचा मुलगा परदेशात शिकण्यासाठी आहे. तो मुलांना आणि पत्नीला मुंबईतून त्याच्या कुटुंबाला बांगलादेशी चलनात पैसे पाठवायचा. पोलिसांनी सांगितले की, शेखने शेवटची २०२१ मध्ये बांगलादेशला भेट दिली होती. तो कोलकाता येथे उड्डाण करायचा आणि नंतर त्याला सीमेपलीकडे चितगावला नेण्यासाठी एजंटांना पैसे देत असे. दरम्यान मानखुर्द पोलिसांनी अटक केलेली रुबिना हिने देखील मुंबईत झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदान केले असल्याचे समोर आले आहे. (Bangladeshi Infiltrators)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community