Shraddha Murder Case: श्रद्धाची हत्या केल्याची आरोपी आफताबची कबुली; म्हणाला जे काही घडले…

देशाला हादरवणा-या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याने न्यायालयासमोर आपला कबुलीनामा दिला आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचे आफताबने न्यायालयात कबुल केले आहे.

आफताबची कोठडी संपत असल्याने त्याला दिल्लीमधील साकेत न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याने न्यायाधीशांसमोर आपणच श्रद्धाची हत्या केली असल्याचे मान्य केले. न्यायालयाने आफताबच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे.

न्यायाधिशासमोर काय म्हणाला आफताब?

आपण रागाच्या भरात कोणताही विचार न करता हत्या केल्याची कबुली आफताबने न्यायाधीशांसमोर दिली. हत्येला सहा महिने झाले असून, काही गोष्टी आपल्याला आठवत नसल्याने पोलिसांना सांगू शकत नसल्याचेही त्याने म्हटले. तसेच, आपण पोलिसांना तपासात सहकार्य करत असून, यापुढेही करत राहू, असे आश्वासन त्याने दिले आहे.

( हेही वाचा: हिजाबविरोधाच्या समर्थनार्थ इराणी फूटबाॅलपटूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार; व्हिडीओ होतोय व्हायरल )

सध्या आरोपी आफताब या प्रकरणात नवनव्या गुन्ह्यांची कबुली देत आहे. पण अशात आफताब पोलिसांना कितपत खरं सांगत आहे, यावर मात्र संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सुरुवातीला त्याची नार्को टेस्ट केली जाणार असल्याचे बोलले जात होते पण पोलिसांनी त्याअगोदर पाॅलिग्राफ टेस्ट करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता आफताबची पाॅलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here