Shraddha Murder Case : आरोपी आफताब पुनावालाच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

84

श्रद्धा वालकर प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंगद्वारे आफताबला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी मेहरौली पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सुद्धा उपस्थित होते. श्रद्धा वालकर प्रकरणी आफताबच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात यावी असे या मेहरौली पोलिसांनी सांगितले होते.

( हेही वाचा : रेल्वेने रात्री प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मिळणार या विविध सुविधा)

पोलिसांनी केलेल्या मागणीनुसार आफताब पुनावालाच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. याआधी आफताबला १३ दिवसांसाठी तिहार तुरूंगात ठेवण्यात आले होते. यानंतर त्याला तिहार तुरूंगातून पोलिग्राफ आणि नार्को टेस्टसाठी पाठवण्यात आले होते.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर काय म्हणाला आफताब?

श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही असे आफताब म्हणाला. या प्रकरणात फाशी झाली तरी हरकत नाही, स्वर्गात गेल्यानंतर मला आणखी अप्सरा भेटतील असे आफताब चौकशी दरम्यान म्हणाला. आफताबच्या या कृत्यानंतर संपूर्ण देशभरात वातावरण तापले आहे. आफताबला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.