आधीपासूनच रचला होता श्रद्धाच्या खूनाचा कट? पाॅलग्राफी चाचणीत आफताबला विचारले ‘हे’ सात प्रश्न

82

दिल्लीत आपली प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करणारा आरोपी आफताब पूनावाला याची पाॅलीग्राफी चाचणी करण्यात आली आहे. या चाचणीदरम्यान आफताबकडून महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली असून, यामुळे तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे. आफताबने आपण आधीपासूनच श्रद्धाच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यासाठीच तिला घेऊन दिल्लीला गेल्याचे त्याने कबूल केले आहे.

आफताबला या पाॅलीग्राफी चाचणीदरम्यान विचारण्यात आलेल्या सात प्रश्नांना त्याने काय उत्तरं दिली. ते नेमके कोणते प्रश्न होते, जे आपण जाणून घेऊया.

( हेही वाचा: नदाव लॅपिड म्हणजे इस्त्रायलमधील जितेंद्र आव्हाड; अतुल भातखळकरांचा टोला )

1- तू श्रद्धाची हत्या केलीस का?
– हो

2- 18 मे रोजी श्रद्धाची हत्या केलीस का?
-हो

3- श्रद्धाच्या शरिराचे तुकडे जंगलात फेकले का?

-हो

4- श्रद्धाच्या हत्येचा कट आधीपासूनच रचला होता का?

-हो

5- श्रद्धाची हत्या केल्याचा काही पश्चाताप आहे का?

-नाही

6- हत्येसाठीच श्रद्धाला दिल्लीत आणले होते का?

-हो

7- तू हत्या केल्याचे तुझ्या कुटुंबियांना माहिती होते का?

-नाही

नेमकी घटना काय?

वसईतील 26 वर्षीय तरुणी श्रद्धा हिचा खून प्रियकर आफताबने दिल्लीत केल्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर, देशभरात खळबळ उडाली. आरोपी प्रियकराने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.