श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला. हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाच्या इंटरनेट सर्च हिस्ट्रीमधून महत्त्वाची माहिती दिल्ली पोलिसांच्या हाती लागली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर जून महिन्यात आफताबने जगातील सर्वात महागडा खटला ऑनलाईन पाहिला होता. हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर यांच्या खटल्यातील संपूर्ण युक्तिवाद आफताबने पाहिला. तसेच पॉलिग्राफ टेस्टमध्ये दृश्यम सिनेमा पाहून श्रद्धाची हत्या केल्याचे सुद्धा आफताबने कबूल केले आहे.
( हेही वाचा : अर्जेंटिना, आयर्लंड, इंडोनेशिया, सिंगापूर, श्रीलंकेच्या वाणिज्यदूतांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन)
हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि एम्बर हर्ड प्रकरण नेमके काय?
हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपची पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्डने २०१८ ला वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. यात ती घरगुती हिंसाचाराची पीडित असल्याचे तिने सांगितले होते. जॉनीने तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचे हर्डने म्हटले होते. यानंतर जॉनीने तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. जॉनीच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. संपूर्ण जगात हा खटला लाईव्ह पाहण्यात आला. याचे प्रक्षेपण आफताबने श्रद्धाच्या हत्येनंतर पाहिले होते. जॉनीला भरपाई म्हणून १५ मिलियन डॉलर मिळाले होते.
आफताबच्या सर्च हिस्ट्रीवरून ही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पकडले तर कायदेशीर लढाई कशी जिंकायची याबाबत आफताब अभ्यास करत होता. याच माहितीचा वापर करून आफताबने दिल्ली तसेच मुंबई पोलिसांची दिशाभूल केली होती. आफताबला केव्हातरी पकडले जाणार याची कल्पना होती म्हणूनच त्याने पूर्वतयारी करून ठेवली होती.
श्रद्धा वालकरच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केल्यावर आफताबला चौकशीकरता बोलावण्यात आले होते. परंतु त्यावेळी श्रद्धा सोडून गेल्याचे त्याने सांगितले आणि पोलिसांची दिशाभूल केली.
Join Our WhatsApp Community