श्रद्धाच्या हत्येला आफताबचे आई-वडीलही जबाबदार 

99

श्रद्धा वालकर हिने दोन वर्षांपूर्वी आफताबकडून आपल्या जिवाला धोका आहे, अशी भीती व्यक्त केली होती. तुळींज पोलीस ठाण्यात तिने रितसर लेखी तक्रार केली होती. मात्र एका महिन्यातच आफताब आणि त्याच्या कुटुंबाने तिचे मनपरिवर्तन करून आफताब विरोधात केलेली तक्रार मागे घेण्याची विनंती केली होती. दरम्यान श्रद्धाने तुळींज पोलीस ठाण्यात १९ डिसेंबर २०२० रोजी स्वतः हजर राहून आफताब विरोधातील तक्रार मागे घेतली होती. तुळींज पोलिसांनी तसा तिचा जबाब नोंदवून घेतला होता.

श्रद्धाने पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने आफताबच्या आई-वडिलांनी आमच्या घरी येऊन आमचा वाद मिटवला आहे, आता माझी आफताब विरोधात काही एक तक्रार नसून मी दिलेली तक्रार अर्ज मागे घेत असल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. श्रद्धाचा तुळींज पोलिसानी १९ डिसेंबर २०२० रोजी घेतलेल्या जबाबाची प्रत ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या हाती आली आहे.

(हेही वाचा कुमारस्वामींचा सत्ता जिहाद! म्हणाले, पुन्हा सत्ता दिल्यास…)

आफताब पुनावालाचे कुटुंब सुरक्षित ठिकाणी

श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आणि श्रद्धा वालकर प्रियकर आफताब पुनावाला याचे कुटुंब सुरक्षित असून पोलिसांच्या देखरेखीत असल्याची माहिती समोर येत आहे. श्रद्धा वालकर हत्यांकांड प्रकरणी आफताबला अटक केल्यानंतर त्याचे कुटुंब अचानक वसईतून निघून गेले, त्यांच्या घराला कुलूप असून पुनावाला कुटुंब बेपत्ता असल्याच्या वावड्या उठू लागल्या होत्या. मात्र मुलाने केलेल्या क्रूरकृत्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून हे कुटुंब एका अज्ञातस्थळी निघून गेले, या कुटुंबांनी आपले मोबाईल फोन देखील बंद असल्यामुळे वसई-विरार परिसरात एकच चर्चा सुरू होती.

अफताबचे कुटूंब घर सोडून गेले

सुत्राच्या म्हणण्यानुसार श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर आफताब हा वसई येथे आला होता व त्याने रातोरात वसई येथून घरातून दोन बॅगा भरून कपडे आणि स्वतःचे सामान घेऊन निघून गेला होता. आफताबचे घरी येणे, रातोरात कपडेलत्ते घेऊन निघून गेल्यामुळे त्याच्या कुटुंबाला संशय आला होता. मुलाने काही तरी चुकीचे केले असल्याचा संशय पुनावाला कुटुंबाला आला होता, अशी चर्चा वसई परिसरात सुरू आहे. आफताबला पोलिसांनी अटक केली आणि त्याने श्रद्धाचा खून केल्याचे उघड झाल्यावर पुनावाला कुटुंब देखील हादरले. त्यांनी कोणालाही काही कल्पना न देता आपले चंबूगबाळ घेऊन वसईतील घर बंद करून निघून गेले होते. पुनावाला कुटुंबाच्या अचानक अशा पद्धतीने जाण्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पोलिसांनी मात्र हे गंभीरतेने घेऊन त्याचा शोध घेऊन हे कुटुंब सुरक्षित आहे. मुलाने केलेल्या कृत्यामुळे पुनावाला कुटुंबाला समाजात तोंड द्यावे लागेल, या भीतीने हे कुटुंब घर सोडून निघून गेले, अशी माहिती समोर आली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.